Nagpur : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही वादाची ठिणगी पडली आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू असतानाच त्यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या ध्येयधोरणावर सडकून टीका करतानाच गंभीर आरोप केले आहे. याचवेळी तुपकर हे पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात आहे. यानंतर भाजप नेत्याकडून तुपकर यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे.
भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुपकर यांना भाजपप्रवेशाची ऑफर दिली आहे. देशमुख म्हणाले, 'सामान्य शेतकऱ्याच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा स्वाभिमान जपला जात नाहीये. शेतकऱ्याचं हित लक्षात घेता रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पक्षात प्रवेश करावा. तुपकर यांच्या माध्यमातून एक चांगला सहकारी, कार्यकर्ता आणि एक चांगला नेता आम्हाला भेटेल. त्यामुळे त्यांना मी भाजप(BJP)कडून थेट ऑफर देत आहे असेही ते म्हणाले.
'' नाना पटोलेंची नानागिरी लवकरच संपेल...''
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बहुजन समाजाच्या नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. तसेच रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी पक्षसंघटनेवर दावा करण्यापेक्षा भाजपमध्ये यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्याचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत. तसेच नाना पटोलेंची नानागिरी लवकरच संपेल. त्यांचे प्रदेशाध्यपद जाईल असे भाकितही भाजप नेते आशिष देशमुख यांनी केले आहे.
तुपकर नेमकं काय म्हणाले होते...?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रगंली आहे. याचवेळी त्यांनी बुलडाण्यात संघटनेच्या बैठक बोलावली होती. त्यात " आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे , माझ्याऐवजी दुसरे कोणी असतं तर आत्महत्या केली असती" अशा शब्दात तुपकर यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली खंत व्यक्त केली.
तसेच मला संघटनेतून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची आहे. आता महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणार असून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.