Supreme Court On Rahul Gandhi: राहुल गांधींना कोर्टाकडून मोठा दिलासा; खासदारकी पुन्हा मिळणार..

Supreme Court Verdict on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी पुन्हा खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या शिक्षेला आव्हान देत राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात तीन तास चर्चा झाली. "यापुढे भाषण देताना राहुल गांधी हे काळजी घेतील,' अशी अपेक्षा न्यायालयाने यावेळी व्यक्त केली.

Rahul Gandhi
BMC Election News: भाजपचं ठरलं ! मुंबई महापालिकेसाठी १३८ जागांवर मराठी चेहऱ्यांना संधी

मी माफी मागितली नाही, म्हणून मला अहंकारी म्हटलं गेलं पण मी माफी मागणार नाही, कारण कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला गेला, अशी माहिती राहुल गांधींच्या वतीने कोर्टात देण्यात आली. राहुल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.

मानहानीचा खटला दाखल करणाऱ्या पूर्णेश मोदी यांचे खरे आडनाव मोदी नसून त्यांनी आपले आडनाव बदलल्याचे राहुल यांच्या वकिलांनी सांगितले. ते म्हणाले, "तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे खरे आडनाव मोदी नाही. हे आडनाव त्यांनी नंतर धारण केले आहे,"

"राहुल गांधी यांची वागणूक अहंकारी आहे त्यामुळे ही याचिका फेटाळून लावली पाहिजे," असे लेखी उत्तर पूर्णेश मोदी यांनी न्यायालयात सादर केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com