Nagpur News : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच परिवहन आणि रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:बद्दलच मोठे विधान केले आहे. त्यांनी, ‘आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे,’ असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, गडकरी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले असावेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामधील पारडसिंगा येथे सती अनुसया माता देवस्थानात आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या समारोप समारंभात रविवारी गडकरी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे त्यांना निवृत्तीची चाहूल तर लागली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
गडकरी यांनी शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना विद्यार्थी आणि शिक्षकांना निरोगी आरोग्य राखण्याचा सल्ला देताना आपणही दररोज अडीच तास योगासन करतो. विद्यार्थ्यांनीही योगासन केली पाहिजेत, आयुष्य उत्तम जगले पाहिजे, असे म्हटले आहे.
तसेच तरुणपणी पक्षासाठी काम करताना वेळकाळ न बघता परिश्रम घेतले. समोसा खाऊन झोपी जायचो, पण कोरोनानंतर शिस्तीत आलो. आता दररोज योगा करतो. यामुळे तब्येत चांगली आहे. त्यामुळे तब्येत चांगली असेल तर आनंद घेता येईल. तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही. मात्र, आता मी जास्त काम करू शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
गडकरी यांनी नव्या पिढीला प्रोत्साहन देताना हे विधान केलं असलं, तरी त्यांनी केलेल्या स्वत:बद्दलच्या या विधानामुळे त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.