Girish Mahajan Sarkarnama
विदर्भ

Girish Mahajan : 'ऑपरेशन टायगर' होणारच, गिरीश महाजनांचा दावा

BJP Girish Mahajan media Nagpur MVA Mahayuti Operation Tiger : मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'वर भाष्य करताना महाविकास आघाडीला गळती लागणार असल्याचे म्हटले.

Rajesh Charpe

Nagpur News : सध्या राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची मोठी चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार महायुतीत येणार असल्याचे बोलले जात आहे. यात किती तथ्य आहे हे कोणालाच ठावूक? संबंधित खासदारांनीही आपली भूमिका जाहीर केली नाही.

मात्र याबाबात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या काही दिवसात महाविकास आघाडीला गळती लागल्याचे दिसेल, असे सांगून 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठे विधान केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, काँग्रेस (Congress) असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसह अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ते सर्व महायुतीत यायला इच्छुक आहेत. दररोज संपर्क सुरू आहे. नगरसेवकांना मुख्य प्रवाहात यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. येत्या काही दिवसातच याची सर्वांना प्रचीती आल्याचे दिसेल असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून मोठा वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्ह्यावर दावा केला आहे, तर रायगड आम्हाला देण्याची मागणी शिवसेनेची आहे. मात्र भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केले होते. यावरून वाद उद्‍भवल्यानंतर मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला महायुतीने स्थगिती दिली आहे. महायुतीमधील तीनही पक्षांनी आमचा पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

तीनही पक्ष तोलामोलाचे आहेत. म्हणून प्रत्येकाला आपल्या पक्षाचा पालकमंत्री व्हावे असे वाटत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी कुंभमेळा झाला तेव्हा मी पालकमंत्री होतो. आता पुन्हा दीड दोन वर्षांनी नाशिक कुंभ भरणार आहे. म्हणूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पालकमंत्री केले होते. कुंभाचे नियोजन सुरळती व्हावे, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, असे मंत्री महाजन यांनी म्हटले.

कुंभमेळ्याचे मोठे चॅलेंज आहे. गेल्या वेळेपेक्षा दुप्पट संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे. गेल्यावेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मला नियुक्त केले होते. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता. आता नाशिक असो वा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री तीनही पक्षाच्या संमतीनेच होणार असल्याचा दावाही गिरीश महाजन यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT