
Mumbai News : मुंडे परिवाराचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडावर मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुक्काम केल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. गेल्या 53 दिवसांपासून त्यांना आणि समाजाला टार्गेट करणाऱ्यांवरून, त्यांनी गडावरून तोफ डागली.
"संतोष देशमुख यांना न्याय देताना, अशी निर्घृण हत्या केलेल्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे की, माझा राजीनामा घेऊन, एका समाजाला किंवा मला टार्गेट करून फायदा घ्यायचा, हा ज्याचा, त्याचा विचार करण्याचा भाग आहे", असा टोला मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला.
मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पहिल्यांदा काल सायंकाळी भगवान गडावर पोचले. तिथं न्यायाचार्य नामदेवशास्त्री महाराज यांची भेट घेतली. यानंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. यानंतर मंत्री मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत, नामदेवशास्त्री महाराजांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.
धनंजय मुंडे म्हणाले, "जे काही प्रकरण घडलं, ते प्रकरण 53 दिवस चालू आहे. यात सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. आमच्या देखील पहिल्यापासून म्हणणं आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यातील जे कोण आरोपी असेल, त्यांन फासावर लटकवलं पाहिजे. केस फास्टट्रैकवर (Court) आणली पाहिजे.जे कोण सापडेल, कोणी असो. कोणालाही सोडू नये. त्याला शासन झाले पाहिजे".
'पहिल्या दिवसांपासून भूमिका आहे आणि ती आजही आहे. ही काही भूमिका आहे. आपण स्वतःहून भूमिका मांडल्यानंतर, काही जण राजकारण करत आहेत. माझा राजीनामा घेण्यापुरता आहे का? संतोष देशमुख यांना न्याय देऊन, अशी निर्घृण हत्या केलेल्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे की, माझा राजीनामा घेऊन, एका समाजाला किंवा मला टार्गेट करून फायदा घ्यायचा, हा ज्याचा, त्याचा विचार करण्याचा भाग आहे. यातील गुन्हेगारांना फासावरच लटकवलं पाहिजे', असेही मंत्री मुंडे यांनी म्हटले.
' संकट आज आलेले नाही. 53 दिवसांपासून पाहत आहात. इलेक्ट्राॅनिक्स मीडिया, समाज माध्यमांवर, याठिकाणी टार्गेट केले जात आहे. मीडिया ट्रायल चालवले जात आहे. या मीडिया ट्रायलमध्ये या तीन महिन्यात, 53 दिवसांमध्ये एक शब्द देखील मी बोललो नाही. संकट 53 दिवसांचे होते. या दिवसांत मी कधीही इथं आलो असतो. त्या भावनेतून, मंत्री झालो पण आपण, कधीही गडावर आलो नाही. दर्शन झालं नाही. या व्यापामुळे. त्यामुळे इथं मुक्काम करून, मुंबईला जात आहे. बाबांचे दर्शन झाले की, इथून शक्ती, प्रेरणा, आपली श्रद्धा, आणि तिच खरी ताकद आहे. सर्वसामान्यांची सेवा करत, पुढं निघू', असा विश्वास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला.
'न्यायाचार्य बाबांनी हा गड माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या मागे उभा आहे. याच्यासारखी ताकद, शक्ती, बाबांचा न्यायाचार्यांचा विश्वास, गडाचा विश्वास माझ्यामागे उभा करणं, ही फार मोठी जबाबदारी आहे. गरिबातल्या गरिब माणसांतल्या एक-एक रुपयांतून हा गड निर्माण झाला आहे. म्हणूनच, संतश्रेष्ठ भगवानबाबांना ऐश्वर्यसंपन्न म्हटलं जातं. तो गड बाबांनी, संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात, माझ्या पाठिमागे उभा आहे, याबाबत वाच्यता केली, ही माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे, की त्याचे वर्णन शब्दात सांगू शकत नाही. शक्तीबरोबर जबाबदारी देखील टाकलेली आहे', असे मंत्री मुंडे यांनी म्हटले.
नामदेवशास्त्री बाबांनी कधी राजकीय चर्चा केली नाही. आणि मी कधीही राजकीय चर्चा केली नाही. जी काही चर्चा होती, ती अध्यात्मावर चर्चा केली. ज्ञानेश्वरीतील अनुभव सांगतात. ते ऐकल्यानंतर, आपल्या स्वतःला काहीतरी मिळते. जीवन जगण्यासाठी नक्कीच चांगली मिळालं आहे. लाखोंसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.