BJP Party  Sarkarnama
विदर्भ

Vidarbha BJP News : भाजपचं 'मिशन झेडपी', नागपूर ग्रामीणमध्ये टाकला मोठा डाव

BJP Nagpur Gramin : काँग्रेस नेते सुनील केदार यांचे सावनेर मतदारसंघातील त्यांचे राजकीय वर्चस्व त्यांनी मोडून काढले. सावनेरमध्ये भाजपने जाती पोटजातीची गोळाबेरीज निवडणुकीत भाजपला फायद्याची ठरली. यात नवनियुक्त अध्यक्ष मनोहर कुंभारे यांची मोठा वाटा यात आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : रामटेक लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे नुकसान भरून काढण्यासोबतच नागपूर जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा झेंडा फडकवण्यासाठी यावेळी भाजपने नागपूर (Nagpur) ग्रामीणमध्ये दोन जिल्हाध्यक्ष करण्याचा नवा प्रयोग केला आहे. काटोल आणि रामटेक असे दोन विभाग करून अनुक्रमे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर कुंभारे आणि माजी सभापती आनंदराव राऊत यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

मनोहर कुंभारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांचे ते कट्टर समर्थक होते. जिल्हा परिषदेचे ते माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी याही जिल्हा परिषद सदस्य होत्या. केदार यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी त्यांना भाजपने आपल्याकडे खेचल्याचे बोलले जात होते.

सावनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट दिले जाईल अशी अटकळ बांधल्या जात होती. मात्र, केदारांना न्यायालयाने दिलासा दिला नाही. त्यामुळे त्यांना विधानसभेची निवडणूक लढता आली नाही. नंतर भाजपनेही आपला प्लॅन बदलवला. आशिष देशमुख यांना मैदानात उतरवले.

काँग्रेस नेते सुनील केदार यांचे सावनेर मतदारसंघातील त्यांचे राजकीय वर्चस्व त्यांनी मोडून काढले. सावनेरमध्ये भाजपने जाती पोटजातीची गोळाबेरीज निवडणुकीत भाजपला फायद्याची ठरली. यात नवनियुक्त अध्यक्ष मनोहर कुंभारे यांची मोठा वाटा यात आहे.

लाडकी बहीण योजनेची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. सर्वाधिक लाभार्थी सावनेरमधून कुंभारे यांनी केले होते. आता जिल्हा परिषद निवडणुकीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली असल्याचे दिसून येते.

नागपूर जिल्हा परिदेवर दहा वर्ष भाजपचा झेंडा फडकत होता. राज्यात महविकास आघाडीची सत्ता येताच केदार यांनी तो उतरवला. तब्बल 34 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून त्यांनी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. भाजपला फक्त 14 जागांवर समाधान मानावे लागले होते.

आता जिल्हा परिषदेच्या दोन मुरब्बी नेत्यांना अध्यक्ष करून भाजपने मिशन झेडपीची तयारी सुरू केली असल्याचे संकेत दिले आहेत. काटोल आणि रामटेक असे दोन विभाग करून अनुक्रमे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर कुंभारे आणि माजी सभापती आनंदराव राऊत यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याचं दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT