Pyare Khan Sarkarnama
विदर्भ

Pyare Khan : अध्यक्ष होताच प्यारे खान यांनी साधला काँग्रेसवर निशाणा

BJP Nagpur President Pyare Khan Targeted the Congress : अध्यक्षपदी नियुक्ती होताच प्यारे खान यांनी भाजपला जे जमले ते काँग्रेसने आम्हाला का दिले नाही असा सवाल उपस्थिती करून काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.

Rajesh Charpe

Nagpur Political News : लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान केले नसल्याने मोठा असंतोष कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. भाजपने हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

अध्यक्षपदी नियुक्ती होताच प्यारे खान यांनी भाजपला जे जमले ते काँग्रेसने आम्हाला का दिले नाही? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.

प्यारे खान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने मुस्लिम समाजाची मते त्यांनी भाजपला मिळवून दिली. याचे बक्षीस तत्काळ त्यांना देण्यात आले. कोरोनाच्या काळात प्यारे खान सर्वपरिचित झाले.

ऑक्सिजनचे टँकर त्यांनी पुरविले होते. एवढेच नव्हे तर नागपूरला येणारे टँकर इतर राज्यात पळवून नेले जात असताना त्यांनी पकडून दिले होते. तेव्हापासून 'ऑक्सिजन मॅन' म्हणून त्यांना ओळखले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांच्यासाठी मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये त्यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या.

मागील दहा वर्षांपासून अल्पसंख्याक आयोगासह विविध आयोगावर मुस्लिम समाजाला भाजपनेच प्रतिनिधित्व दिले असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अडीच वर्षे सत्ता असताना काँग्रेसने एकाही मुस्लिम समाजातील व्यक्तीची नियुक्ती आयोगावर करण्यात आली नव्हती.

लोकसभेत उमेदवारी दिली नाही. विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त असतानाही महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही. काँग्रेस फक्त मतांसाठी मुस्लिम समाजाचा वापर करते. त्यांचे हे डावपेच आता लोकांना समजले असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.

अल्पसंख्यकांचे अनेक उपक्रम अर्धवट पडले आहेत. उत्तर नागपूरमधील (Nagpur) इस्लामिक कल्चरल सेंटरचा (ऊर्दू घर) यात समावेश आहे. या मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री नितीन राऊत यांना फक्त निवडणूक आली की अल्पसंख्यांक समाज आठवतो.

त्यांच्याच मतदारसंघात अल्पसंख्यांकासाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र तयार केले जाणार होते. मात्र, इतक्या वर्षात साधी इमारतसुद्धा उभी केली नाही. आता आपल्या पदाचा वापर आपण इस्लामिक कल्चरल सेंटर सुरू करण्यासाठी केला जाईल. या सेंटरचा विकास अल्पसंख्याक विभाग मार्फतच करण्यात येणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT