Amol Mitkari News : 'इतर जिल्ह्यात कुणाची मतं राष्ट्रवादीला ट्रान्सफर झाली की माहीत नाही? मात्र,..' ; मिटकरींचं विधान चर्चेत!

Amol Mitkari On Loksabha Election and Mahyuti : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा बोलून दाखवली मनातली खदखद? ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिवारीच महायुतीच्या मेळाव्यात सर्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले होते.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

NCP Amol Mitkari at Akola News : मुंबईत शनिवारीच महायुतीचा मेळावा पार पडला. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांचे कान टोचले. त्यांनी महायुतीत विसंवाद वाढेल अशी वक्तव्य करू नये, अशी तंबी दिली होती. मात्र त्यानंतरही अमोल मिटकरी यांचं एक विधान समोर आल्याने महायुतीमधील अंतर्गत नाराजी अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे.

रविवारी अकोल्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव(Prataprav Jadhav) आणि खासदार अनुप धोत्रेंच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरींनी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाची मतं अजित पवारांना मिळाली नसल्याची खंत अप्रत्यक्षपणे बोलून दाखवल्याचे समोर आले.

Amol Mitkari
Video Devendra Fadnavis : कधी नव्हे ते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले; 'खुमखुमी असेल तर...'

इतर जिल्ह्यात कुणाचे मतं राष्ट्रवादीला ट्रांसफर झाले की माहीत नाही? मात्र, अकोल्यात राष्ट्रवादीची मतं भाजपला मिळाली असल्याचा टोला अमोल मिटकरी(Amol Mitkari) यावेळी लगावला. त्यामुळेच महायुतीतील इतर दोन पक्षांची मतं राष्ट्रवादीला मिळाली नसल्याची खदखद पक्षात तशीच असल्याचं बोललं जातंय.

लोकसभा निवडणुकीचा निकाल आला अन् महायुतीत कलगीतुरा रंगला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या. घटक पक्षांतील अनेक नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून झालेल्या अवस्थेस जबाबदार असल्याची टीका केली गेली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस(Devendra Fadnavis) चांगलेच भडकले. त्यांनी महायुतीतील वाचाळवीरांना उद्देशून कडक भाषेत सुनावले आहे.

मुंबईतील षणमुखानंद सभागृहात शनिवारी महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय महायुतीच्या नेत्यांचेही कान टोचले होते.

Amol Mitkari
Ajit Pawar News : '...या ठिकाणी समन्वय साधण्याचं ठरवलं होतं, पण ते झालं नाही'; महायुतीवर अजित पवार स्पष्टचं बोलले!

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? -

'मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो, आपण जर महायुतीमध्ये एकत्र आहोत तर आज आपलाच अनेकवेळा आपआपसात विसंवाद दिसतो. आपलचे प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात कायकाय बोलतात. हे बंद केलं पाहीजे आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपआपल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे मी हे बोलू का?'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com