Manoj Jarange rally Mumbai : मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी मनोज जरांगे पाटील जालनामधून मुबंईच्या दिशेने कूच केली आहे. गणेशोत्सवाचे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच, जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने राज्यातील सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.
यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अमरावतीमधील भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी यावर प्रतिक्रिया देताना, 'हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' असे म्हटलं आहे.
नवनीत राणा यांनी आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटील (Manoj Jarange) भूमिकेवर प्रतिक्रिया देताना, "न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. गणेशोत्सव हिंदूंचा मोठा सण आहे. महाराष्ट्रात खूप उत्साहाचं वातावरण असून, तो महाराष्ट्रात अतिशय भक्तीभावानं सर्वत्र साजरा केला जात आहे. मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणी खूप गर्दी उत्साह असतो. त्यामुळे हे 11 दिवस सोडून, परत आपल्या मागणी रोडवर आणू शकता."
'11 दिवस आपले सण आहेत. यामध्ये कुठले प्रकारे विघ्न न टाकता, 11 दिवसानंतर मागणी करू शकता, असे सांगताना कोण हिंदुत्ववादी (Hindu) आहे हे कोणी ठरू शकत नाही. हिंदूच्या सणाला विघ्न आलं नाही पाहिजे,' असेही माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाईसाठी मुंबईकडे आज रवाना झाले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवामुळे मुंबईत जरांगे पाटील यांना आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. आंदोलन खारघरला करावे, असा पर्याय न्यायालयाने दिला आहे. परंतु जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार अशी ठाम भूमिका घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजप महायुती सरकारमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण उपसमिती कार्यरत झाली आहे. या उपसमितीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्री विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत हे अहिल्यानगर किंवा पुणे इथं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत जरांगे पाटलांचं मन वळवण्यात मंत्री विखे पाटील यांना यश येत का? याकडे आला लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.