Mahayuti in Buldhana Google
विदर्भ

Gram Panchayat Election : बुलडाण्यात महायुतीचा गड आला; पण जळगाव जामोदचा सिंह गेला

Buldhana Politics : जामोद ग्रामपंचायतीवर भाजपला पराभूत करीत काँग्रेसचा झेंडा

जयेश विनायकराव गावंडे

Tough Fight : बुलडाणा जिल्ह्यात मुदत संपलेल्या ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. ६) जाहीर झाला आहे. निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, अत्यंत प्रतिष्ठेची लढत बनलेल्या भाजप आमदार संजय कुटे यांच्या मतदारसंघातील जामोद ग्रामपंचायतीवर काँग्रेसनं ताबा मिळवला. जागोद ग्रामपंचायतमध्ये डॉ. संजय कुटे यांना मोठा धक्का बसला. येथे काँग्रेसची सत्ता आली आहे.

जिल्ह्यात ४८ सरपंचांच्या विजयानंतर आता हा उमेदवार आपल्याच पक्षाचा असल्याचे दाखविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे निकाल संमिश्र स्वरूपाचे आहेत. (BJP NCP & Shivsena Alliance wins in Gram Panchayat Election in Buldhana District)

मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालात महायुतीला २३ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला १४ ग्रामपंचायतींवर समाधान मानावं लागलं. स्थानिक आघाड्यांना ११ ग्रामपंचायतींवर यश मिळालं आहे. जिल्ह्यात सर्वांत चर्चेची ग्रामपंचायतची निवडणूक होती ती जळगाव जामोद तालुक्यातील जामोद ग्रामपंचायतची. ही ग्रामपंचायत याआधी भाजपच्या ताब्यात होती. मात्र, या ठिकाणी मोठा बदल झाला. १७ पैकी १५ जागा जिंकत काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला.

जामोद ग्रामपंचायतची निवडणूक भाजप नेते आमदार डॉ. संजय कुटे यांनी प्रतिष्ठेची केली होती. जळगाव जामोद तालुक्यात एकूण तीन ग्रामपंचायतची निवडणूक होती. त्यापैकी दोन ग्रामपंचायत काँग्रेसने जिंकल्या आहेत. एक ग्रामपंचायत स्थानिक आघाडीनं जिंकली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या शिंदे गटाचाही जिल्ह्यात दबदबा आहे. मेहकर तालुक्यात सातपैकी चार ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचं वर्चस्व राहिलं आहे. लोणार तालुक्यातही दोन ग्रामपंचायत शिंदे गटानं जिंकल्या. बुलडाणा तालुक्यात दोन ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला यश मिळाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं वर्चस्व राखता आले असून, जवळपास सर्वच तालुक्यात काँग्रेसला ग्रामपंचायत मिळाली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला १४ ग्रामपंचायत जिंकता आल्या. एकूणच या निकालात भाजपनं जरी आघाडी घेतली असली तरी कुटे यांना निकालामुळं मोठा फटका बसला आहे. त्यामुळं भाजपला बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळात अधिक मशागत करावी लागणार आहे. घाटाच्या वरील भागात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं प्राबल्य आहे. घाटाच्या पलीकडं मेहकरमध्ये पुन्हा खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे सेनेला मजबूत ठेवले आहे. घाटाखालील बुलडाण्यात आता कुणाची पाळंमुळं पक्की होतात हे आगामी काळात कळेलच.

(Edited By : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT