Devendra Fadanvis, Dr. Ashish Deshmukh, Dr. Ashok Jivtode and Chandrashekhar Bawankule. Sarkarnama
विदर्भ

BJP News : विदर्भातील ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव, भाजपचे एक पाऊल पुढे !

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

Alignment of OBC leaders in Vidarbha : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात खासकरून पूर्व विदर्भात मोठा फटका बसल्यानंतर २०२४च्या निवडणुकीची तयारी करताना भाजप नेते एक-एक पाऊल फुंकून फुंकून टाकत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने विदर्भात ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. (BJP had reduced number of MLAs)

२०१९च्या निवडणुकीत तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह काही ओबीसी नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपकडे आमदारांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर त्या चुकीची भरपाई करण्यासाठी पक्षाने कसलीही कसर ठेवली नाही. कारण ओबीसींची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नाही, हे शिर्षस्थ नेत्यांच्या लक्षात आले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यानंतर ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. त्याच्या काहीच दिवसांनंतर आमदार बावनकुळेंकडे प्रदेशची जबाबदारी सोपवून ओबींसींना आपलेसे करण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केला. त्यात पक्षाला बऱ्यापैकी यशही मिळाले.

ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव करताना काल (ता. २५) भाजपने एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. चंद्रपूर येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे विदर्भवादी नेते असून राष्ट्रीय ओबीसी महसंघाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. डॉ. जिवतोडे यांचा चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. कारण चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जाळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

डॉ. अशोक जिवतोडे (Dr. Ashok Jivtode) यांना पक्षात घेऊन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजय सुकर करण्याचा भाजपचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. चंद्रपूर लोकसभा हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे आणि येथील कुणबी समाज जेवढा जोडला येईल, तो जोडावा, असा भाजपचा प्रयत्न आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. सर्व तयारी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीची सुरू आहे. २४ बाय सात इलेक्शन मोडवर असणाऱ्या भाजपने त्यासाठीच ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. ओबीसींना जोडण्याचा यापूर्वीचा भाजपचा प्रयत्न म्हणजे डॉ. आशिष देशमुख. डॉ. जिवतोडेंच्या आधी भाजपने (BJP) देशमुखांना सोबत घेतले आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर, काटोल हे मतदारसंघ पक्के केले.

सावनेरमध्ये आमदार सुनील केदार आणि काटोलमध्ये माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपकडे तुल्यबळ उमेदवार म्हणून पाहिजे तसे चेहरे नव्हते. डॉ. आशिष देशमुखांना सोबत घेऊन भाजपने सावनेर आणि काटोलमध्ये जोरदार टक्कर देण्याची तजवीज आजच करून ठेवली आहे.

‘मी निवडणूक लढण्यासाठी नव्हे, तर ओबीसी आणि विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये परत आलो’, असं डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) सांगत असले तरी भाजप त्यांना दोनपैकी एका मतदारसंघातून लढवणार असल्याची माहिती आहे. कारण २०१४मध्ये आशिष देशमुखांनी काका अनिल देशमुख यांना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर ही जुळवाजुळव महत्वाची मानली जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT