Devendra Fadnavis Criticism Ncp Over OBC : '' राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षात ओबीसी नेते फक्त...'' ; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

BJP Vs NCP : '' भारतीय जनता पार्टीचा 'डीएनए'च ओबीसीच....''
Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात मला विरोधी पक्षनेतेपदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला त्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं. संघटनेत मला कोणतंही पद द्या. मी त्या पदाला न्याय देईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यांचा रोख पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर असल्याचं लपून राहिलेलं नाही.

यानंतर राजकीय वर्तुळासह राष्ट्रवादीतही अनेक घडामोडी घडल्या असून छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्याला मिळावं अशी मागणी केली आहे. याचवरुन आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चंद्रपूर येथे भाजपाच्या कार्यक्रमात रविवारी (दि.२५) बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करतानाच राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम देशात आणि महाराष्ट्रात भाजपा करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) सारख्या पक्षात त्यांना फक्त चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी नेते हवे आहेत. पदं देण्यासाठी नको आहेत. पदं देताना तिथे कधी ओबीसीचा विचार होत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

Devendra Fadnavis, Sharad Pawar
BJP on Action Mode: पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर भाजप ॲक्शन मोडवर; मित्र पक्षांची बोलवली तातडीची बैठक

...यापेक्षा मोठा ओबीसींचा सन्मान काय असू शकतो !

फडणवीस म्हणाले, “सामान्य ओबीसी(OBC) घरातील मुलगा आज देशाचा पंतप्रधान म्हणून संपूर्ण विश्वात भारताचा तिरंगा फैलावत आहे. यापेक्षा मोठा ओबीसींचा सन्मान काय असू शकतो. आपण कालही पाहिलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सगळे खासदार मोदींचं कशाप्रकारे स्वागत करत होते. त्यातून खऱ्या अर्थाने मोदींचा मान वाढलाच पण मोदींपेक्षाही भारताचाही मान वाढला.

देशाच्या मंत्रिमंडळात जेवढे ओबीसी मंत्री आहेत, इतके ओबीसी मंत्री यापूर्वीच्या कुठल्याही मंत्रिमंडळात नव्हते. हा एक ओबीसी मंत्र्यांचा रेकॉर्ड मोदींच्या मंत्रिमंडळाने पूर्ण केला आहे. हे सगळं मी यासाठी सांगतोय. कारण भारतीय जनता पार्टी(BJP)चा डीएनएच ओबीसी आहे असल्याचंही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Basavaraj Bommai Big Statement: कर्नाटकमध्ये भाजप लोकसभेच्या 25 जागा जिंकेल; बसवराज बोम्मईंचा मोठा दावा

ओबीसींसाठी जे काही निर्णय झाले, ते...

आजपर्यंत ओबीसींसाठी जे काही निर्णय झाले, ते निर्णय एकतर मी मुख्यमंत्री असताना झाले किंवा देशात पंतप्रधान मोदी यांनी केले. आपण ओबीसी मंत्रालय स्थापन केलं. ‘महाज्योती’ सारखी संस्था काढून ओबीसी मुलांसाठी पीएचडी, एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी दारं खुली केली. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली अशी माहिती फडणवीसांनी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com