Nitesh Rane Controversy : भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. अशातच आता मंत्री राणे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नागपूरमध्ये नमाज पठणाच्या वादावर भाष्य करताना त्यांनी थेट राज्यातील मदरशांना टार्गेट केलं आहे. तसंच भारतात धर्मनिरपेक्ष नावाची कोणतीही गोष्ट नाही, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
एका सभेत बोलताना मंत्री राणे म्हणाले, भारत हे हिंदू राष्ट्र असून ते इस्लामिक राष्ट्र नाही. इथे ९० टक्के हिंदू राहतात. पाकिस्तान बांग्लादेश हे इस्लामिक राष्ट्र आहेत. भारत धर्मनिरपेक्ष वगैरे काही नाही, असं म्हटलं आहे.
तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यामध्ये सेक्युलर हा शब्द नव्हता, त्याचा उल्लेख नव्हता. नंतर काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यसाठी तो शब्द संविधानात घातला. आपण सर्व हिंदू आहोत. त्यामुळे हिंदू भूमीची सुरक्षा करणं, राष्ट्राला ताकद देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,' असंही राणे म्हणाले.
तसंच यावेळी त्यांनी मदरशात शिक्षण घेऊन कुणी डॉक्टर किंवा इंजिनिअर झालं का? असा सवाल करत मदरसे हे दहशतवाद्यांचे अड्डे असून मुख्यमंत्र्यांना भेटून सर्व मदरसे बंद करायला सांगणार असल्याचं मोठं वक्तव्य देखील राणे यांनी केलं.
राणेंच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून त्यांनी संविधान आणि मदरशांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपची काय भूमिका आहे? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.