Pune Congress : स्वीकृत नगरसेवकाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय; सतेज पाटलांची गेम चेंजर भूमिका; पुण्यातील 'त्या' उमेदवारांची धडधड वाढली

Pune Congress nominated corporator : काँग्रेसने भाजप सारखीच भूमिका घेतल्यामुळे अनेकांची कोंडी झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत काही मतांनी पराभूत झालेल्या नेत्यांनी स्वीकृतच्या माध्यमातून पुन्हा सभागृहा येण्याची तयारी सुरू केली होती. मात्र प्रदेश पातळीवर झालेल्या या निर्णयामुळे अनेकांचे स्वप्न भंगल्याचं बोललं जात आहे.
Congress nominated corporator Pune
Congress nominated corporator PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 02 Mar : यंदा पुणे महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स गेल्या पंच वार्षिक निवडणुकीपेक्षा चांगला झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला दहा जागांवर यश मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवलं आहे.

या 15 जागांच्या जोरावर आता काँग्रेसला पुण्यातून एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे. या एक जागेसाठी अनेक नेते इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. हे नेते मुंबईपासून दिल्लीपर्यंत आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

या नियुक्तीबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व गटनेत्यांना पत्र पाठवून स्वीकृत नगरसेवकांच्या नावाचे पत्र द्यावे अशी सूचना केली आहे. त्यानुसार 9 मार्चला ही नावे देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता 5 किंवा 6 मार्चला प्रदेश पातळीवरून एक नेता आणि पुण्याचे प्रभारी असलेले सतेज पाटील हे पुण्यात येऊन बैठका घेणार आहेत.

Congress nominated corporator Pune
Akola Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; कारमधून बाहेर न आल्याने मोठा अनर्थ टळला

तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांची मुलाखती देखील यावेळी होणार आहे. त्यानंतर हे दोन नेते काहीं नाव निश्चित करून ती प्रदेश पातळीवरती पाठवणार आहेत. त्यानंतर प्रदेश पातळीवर नावे अंतिम केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे नेते स्वीकृत नगरसेवकाचा उमेदवार निवडण्यासाठी येण्यापूर्वीच प्रदेश काँग्रेसने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

18 तारखेच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला असून त्यानुसार निवडणूक लढलेल्या एकाही उमेदवाराला स्वीकृत म्हणून संधी देण्यात येणार नाही. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचा निर्णय भाजपकडून देखील घेण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसने देखील याबाबत निर्णय घेतला आहे.

Congress nominated corporator Pune
Pakistan Afghanistan war : इस्राईल-इराणमधील युद्ध पेटलं असतानाच पाकिस्तानच्या 4 लष्करी तळांवर मोठा हवाई हल्ला, अमेरिकेचं पूर्वीचं सैन्यतळही टार्गेट

काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांची कोंडी झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत काही मतांनी पराभूत झालेल्या नेत्यांनी स्वीकृतच्या माध्यमातून पुन्हा सभागृहा येण्याची तयारी सुरू केली होती. मात्र प्रदेश पातळीवर झालेल्या या निर्णयामुळे अनेकांचे स्वप्न भंगल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता स्वीकृतची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com