Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis  Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
विदर्भ

Mahayuti News : भाजप, शिंदे गटाची धडधड वाढली; महायुतीकडे अजितदादांनी मागितल्या तब्बल इतक्या जागा

Rajesh Charpe

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून महायुती सावरत आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोपाची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीकडे राज्यातील 90 विधानसभा मतदारसंघाची मागणी केली असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले.

आम्हाला विदर्भासुद्धा जाग वाढवून पाहिजे आहे. याकरिता आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच या भागाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्यावेळीसुद्धा बाबा आत्राम (Dharmarao Atram) यांनी विदर्भातील दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली होती. सोबतच गडचिरोली लोकसभा मतदरसंघातून आपण लढणार असल्याचेसुद्धा त्यांनी जाहीर केले होते. (Mahayuti News)

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात गडचिरोली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात येणार असल्याचाही दावा त्यांनी केला होता. प्रत्यक्षात दोन्ही मतदारसंघात भाजपने सोडण्यास नकार दिल्याने बाबांचा दावा फोल ठरला.

आत्राम यांच्या अहेरी मतदारसंघात लोह खनिजावर आधारित मोठा प्रकल्प विकसित होत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला अजित पवार (Ajit Pawar) येऊन गेले. या प्रकल्पासाठी आपण २५० एकर जमीन दान केल्याचा दावाही आत्राम यांनी केला होता. या दाव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. ही जमीन बाबा आत्राम यांची नसल्याचे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.

प्रकल्पासाठी देण्यात आलेली जमीन कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत शासनाच्या ताब्यात होती. ती जमीन आदिवासींची असल्याने विक्री करता येत नाही. त्यामुळे ती प्रकल्पासाठी दान करण्यात आली. बाबा आत्राम यांनी ही जमीन आपली असल्याने सांगून श्रेय लाटत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

बाबा आत्राम यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर एनपीडीए लावण्याची तयारी केली जात आहे. यासाठी महाराष्ट्र स्वतःचा कायदा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. या कायद्यानंतर डेअरी विभागातील २०० अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अंतर्गत येतील.

कोणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या कारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली दगडफेक चुकीचीच आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई करीत आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही, असा सल्लाही आत्राम यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT