Narendra Bhondekar,Nitin Gadkari
Narendra Bhondekar,Nitin Gadkari sarkarnama
विदर्भ

शिवसेना आमदाराला महाविकास आघाडीत करमेना ; युतीसाठी गडकरींना गळ

Abhijit Ghormare_Guest

भंडारा : भंडारा येथील शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar)यांना महाविकास आघाडीत करमेनासे झाले असून त्यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांना भाजप -सेना युती चे जूने दिवस आणण्याची विनंती जाहीर सभेत केली. त्यामुळे अनेकांची भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना नेत्याचे महाविकास आघाडी सहभागी राहण्यात आता काही रस राहिला नाही का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

गुरूवारी भंडारा शहरातून जाणाऱ्या सहा पदरी बायपास रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना (अपक्ष) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर सभेत ही इच्छा प्रकट करत गडकरी साहेबाना प्रेमळ गळ घातली. ''गडकरी साहेबच भाजप व शिवसेनेचे जुने दिवस आणतील,'' असा विश्वास शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

''केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकनेते आहेत. देशात त्यांच वेगळ नाव असून पक्षपात सोडून सर्वांचे हित जपणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. लोंकाचा कामासाठी ते धावतात, असे नेते देशात खूप कमी आहे,'' असल्याचे सांगत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गडकरीचे कैातुक केले.

भोंडेकर हे जरी अपक्ष निवडणूक लढवून आमदार झाले असले तरी ते अजूनही शिवसेना पदाधिकारी आहेत. शिवसेनेकड़ून जाहीर केलेल्या आमदारामध्ये भोंडेकरांचा समावेश आहे. त्यामुळे ते शिवसेनेचे आमदार म्हणून ओळखले जातात. काल शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप- सेना युती व्हावी यासाठी गडकरींनी गळ घातली.

शिवसेनेने आपल्या परंपरागत मित्राला दूर करता शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडी तयार करत सत्ता स्थापन केली. आज या महाविकास आघाडी ला दोन वर्ष पुर्ण झाली असून दोन वर्षात आघाडीत अनेक वाद विवाद सुरु झाले आहेत. त्यात शिवसेना आमदारांची आपल्याला निधी कमी मिळत असल्याची ओरड सुरु झाली होती, त्यांच्याच हा परिणाम तर नाही ना की आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप सोबत पुन्हा दिलजमाई व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे, अशी चर्चा आता जिल्ह्यात होऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात भाजप सेना युती पुन्हा होणार यांची तयारी तर नाही ना, अशी चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT