Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : 'महाविकास आघाडीत पाच-पाच जण भरदिवसा मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहताय' ; बावनकुळेंचा टोला!

Mayur Ratnaparkhe

Chandrashekhar Bawankule on Loksabha Result : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. शिवाय मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडीतील पाच-पाचजण दिवसास्वप्न पाहात आहेत, असा टोलाही लगावला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघआडीला कधीच मतदान होणार नाही, कारण महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदींच्या योजना रोखणं हे लोकांना माहीत आहे, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

नागपूरमध्ये मीडियाशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत केवळ 0.3 टक्के मतं महाविकास आघाडीला जास्त मिळाली आहेत. मतांबाबातच बोलायचं झालंतर मुंबईत आम्ही दोन लाख मतं जास्त मिळवली आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी पाच-पाच दावेदार बनले आहेत. त्यांना केवळ 0.3 टक्के मतं जास्त मिळाली आहेत.'

'आम्ही जिथं चुकलो आहोत, ते दुरुस्त करू. आम्ही जिथं कमजोर पडलो आहोत तिथे चांगल्याप्रकारे काम करू. ज्या वर्गाचा आम्ही विश्वास जिंकू नाही शकलो, त्या वर्गासाठी सुद्धा आम्ही चांगलं काम करू. परंतु असं नाही की 0.3 टक्क्यांमुळे त्यांचा मुख्यमंत्री होईल. ते सर्वजण दिवसा स्वप्न पाहायला लागले आहेत. मला विश्वास आहे की महाराष्ट्रीतील जनता पुन्हा एकदा विचार करेल.'

'मोदी सरकारच्या पुढील पाच वर्षातील योजना, ज्या गरीब कल्याण, मध्यवर्गीय कल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आहेत. त्या योजना बंद पाडण्यासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. मला अजूनही महाविकास आघाडीचं षडयंत्र असं दिसत आहे, की हे जर चुकून निवडून आले तर पुढे पाच वर्षे जे मोदी सरकार दिल्लीत आहे. त्या केंद्रातील सरकारचा लाभ महाराष्ट्राला मिळणयापासून हे लोक थांबवतील. कारण, हे मोदींना पसंतच करत नाहीत. मोदींवर वैयक्तिक पातळीवर टीका करतात. त्यांना मोदींची भीती वाटते तर मग ते मोदींच्या योजना काय राबवतील.'

'मला असं वाटतं की एकदा आम्ही थोडा बरोबर अंदाज नाही बांधू शकलो, आमच्या काही चूका राहिल्या आहेत, त्या दुरुस्त करू. निश्चितपणे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मोदींच्या योजनेसाठी महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सबसिडीत युरिया मिळण्यासाठी, पीएम किसाना सन्मान योजनेसाठी मोदींच्या सरकारचे काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातूनच पोहचते. महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदींच्या योजना रोखणं आहे.'

'त्यामुळेच महाराष्ट्रात लोक विचार करतील आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कधीच मतदान करणार नाही. पाच-पाचजण मुख्यमंत्रिपदाची दिवसा स्वप्न पाहत आहेत, विकासाबद्दल कोणीच बोलत नाही. सकाळी उठून केवळ टीक करतात. टीकेने पोट भरत नाही, लोकांना कामातून विकास हवा आहे. लोकांना रोजगार हवा आहे, त्यासाठी बोललं पाहिजे.' अशा शब्दांत बावनकुळे यांनी महावकिास आघाडीवर टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT