Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर महाविकास आघाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर आली आहे. महायुतीला अवघ्या 18 जागांवर रोखत आघाडीने तब्बल 31 जागांवर यश मिळवले. त्यामुळे मविआचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाढला आहे. म्हणूनच की काय महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून विधानसभा निवडणुकीत स्वबळाची भाषा वापरण्यात येऊ लागली होती.
तसेच 288 विधानसभेच्या जागांचा आढावा घेणे सुरू झाले आहेत.त्यामुळे लोकसभेला एकत्र लढून फायद्यात राहिलेली महाविकास आघाडी विधानसभेला स्वतंत्र लढणार की काय अशा चर्चा जोरदारपणे सुरू झाली होती. पण अखेर पृथ्वीराज चव्हाण,उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी विधानसभेला एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शनिवारी (ता.15) मुंबईत पार पडली.या पत्रकार परिषदेत मविआला महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मविआच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असून महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे.याचवेळी राजकारणात कोणी लहान मोठा भाऊ नसतो असेही ते म्हणाले.लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या यशाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत,असेही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या शक्तीच्या विरोधात लढावे लागले. तपास यंत्रणाचा गैरवापर करण्यात आला. मात्र, जनतेने आम्हाला साथ दिली. विविध सामजिक संघटना साथ दिली. या निवडणुकीतून कुठल्याही समाजाला गृहीत धरू नका. असा संदेश शेतकऱ्यांनी दिला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी या पत्रकार परिषदेत भाजपवर तुटुन पडले. तसेच मविआचा आगामी विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केले. ठाकरे म्हणाले,"देशात भाजपविरोधात कोणी लढू शकत नाही, असं वातावरण होतं. भाजपचा 'अंजिक्य'पणा महाराष्ट्राच्या जनतेनं ताकदीनं दाखवून दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. आर्थिक आणि यंत्रणेच्या दृष्टीनं ही लढाई फार विचित्र होती. मात्र, संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.