Nagpur News : राहुल गांधी आज नागपूरला संविधान संमेलनासाठी येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने संविधान बचाव आणि भाजपच्या जाती-धर्मांवरील हिंसक राजकारणावर सर्वाधिक भर दिला होता. आज ते काय बोलतात, काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपही त्यामुळे अस्वस्थ आहे.
यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राहुल गांधी शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्यासाठी येत आहेत, असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे विधानसभेच्या निवडणुकीत संविधान याच मुद्यावरून पुन्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रशेखर बानवकुळे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या दौऱ्यावर जोरदार टीका केली. तसंच काँग्रेसकडून देखील राहुल गांधी यांचा हा दौरा यशस्वी व्हावा, यासाठी पुरेपर नियोजन केले आहे. राहुल गांधी यांचा हा दौरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीत होत असल्याने, आणि लोकसभेत प्रचाराचा मुद्दा ठरलेल्या संविधान बचावाशी निगडीत हा दौरा असल्याने सर्वांचेच लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांच्या आक्रमक भूमिकेवर भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह देखील काहीसे बॅकफूटला गेल्याचे दिसतात.
नागपूर इथल्या राहुल गांधी यांच्या या दौऱ्यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राहुल गांधी शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्यासाठी येत आहे, असा दावा बावनकुळे यांनी करत गांधी आणि त्यांच्या दौऱ्याला टार्गेट केले आहे. ठया संमेलनात 165 च्यावर शहरी नक्षलवादी राहुल गांधी यांच्या सोबत आहेत. ते त्यांच्याशी बंद दार चर्चा करणार आहेत. त्यांनी मीडियाला सुद्धा बोलवले नाही. एका बाजूला संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि संविधानाने मीडियाला दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सुरू आहेठ, असा आरोप देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "राहुल गांधी स्वतःच बोलले आहे की, या देशात आरक्षणाची गरज नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान जवळपास 80 वेळा तोडण्याचा काम काँग्रेसने केले. बाबासाहेबांना दोनदा पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले". काँग्रेसला कधीच बाबासाहेबांचे विचार रुचले नाही. राहुल गांधी हे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधी आहेत आणि दुसरीकडे ते संविधानाच्या गोष्टी करतात, असाही आरोप बावनकुळे यांनी केला.
"निवडणूक आली की, शरद पवार भावनिक मुद्दे उकरून काढतात. कधी पावसात भिजतात. निवडणूक लढणार नाही, अशा घोषणा करतात. सहानुभूती मिळवतात. आता जनतेला हे कळून चुकले आहे. ते सहानुभूतीवर जाणार नाही, तर आम्ही केलेल्या कामाकडे जनता लक्ष घालेल", असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.