Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराजांची भारतात आणलेली वाघनखे असली की नकली यावरून सध्या चांगलाच वाद निर्माण झाला आहे. रोजच सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.
राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी यावरून विरोधकांना कडक शब्दात सुनावत 'तुम्ही इतिहासकार नाही आणि तुम्हाला इतिहासुद्धा माहिती नाही' अशा शब्दात फटकारले.
सरकारच्या कुठल्याही योजनेला विरोध करणे एवढेच विरोधकांना माहिती आहे.विरोध करणे ही त्यांची ती सवय झाली आहे. विरोधकांना पोटदुखी होणे स्वाभाविक आहे.मताचे तृष्टीकरण करण्यासाठी ते असे प्रश्न उपस्थित करीत असतात,असेही मुनगंटीवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखावरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सुरू असलेले राजकारण पाहाता विरोधी पक्षनेत्यांना मुळात इतिहास माहित नाही.कुठलीही माहिती न घेता ते बोलत होते. विरोधी पक्षात टीका करणारी काही विशेष लोक आहेत.ते माहिती न घेत बोलत असतात असा टोला त्यांनी लगावला.
अयोध्येतील प्रभू राम मंदिराचा विषय होता तेव्हाही ती काल्पनिक कथा आहे,असे वक्तव्य त्यांनी केले होते. राम सेतूचा विषय होता तेव्हाही उच्च न्यायालयात (Court) गेले. राज्य सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले की विरोधी पक्षातील नेत्यांना टीका करण्याची किंवा त्याच्या विरोधात बोलण्याची सवय झाली आहे त्यामुळे काही टीका करणाऱ्या किंवा विरोधात बोलणाऱ्या नेत्यांकडे दुर्लक्ष करतो,असेही मुनगंटीवार म्हणाले.
विधानसभेत 1980 मध्ये झालेली चर्चा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांनी ऐकली पाहिजे.अतिशय उत्तम चर्चा झाली होती.ती चर्चा ऐकल्यावर त्यांच्या लक्षात येईल असेही मुनगंटीवार म्हणाले. अजित पवार महायुतीमध्ये आहेत आणि ते राहणार आहे.त्यांचा घरवापसी संकेत असल्याचे प्रसार माध्यमांकडून ऐकल आहे, मात्र प्रत्यक्षात ते महायुतीमध्ये राहणार आहे.
विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढवणार आहोत.अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची मैत्री आहे आणि ती पुढेही राहील.खरे तर अजित पवार यांची घरवापसी आहे की नाही? हे मात्र मला विचारण्यापेक्षा त्याबद्दल शरद पवारांना विचारले पाहिजे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.