Nitin Deshmukh and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

BJP Vs Nitin Deshmukh : फडणवीसांना फडतूस म्हणणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना भाजपचा इशारा; म्हणाले...

Akola Political News : भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात 'कोल्डवॉर' सुरू

जयेश गावंडे

Akola Politics : अकोला जिल्हा परिषदेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्याला अपात्र करण्यासाठी अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्री यांनी दबाव टाकल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीसांना ‘फडतूस’ म्हणून संबोधणाऱ्या आमदार नितीन देशमुख यांच्या टीकेला भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.

भाजपचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे नितीन देशमुखांवर टीकेची झोड उठवली आहे. आमदार नितीन देशमुख यांची 'मलाई' बंद झाल्याने ते केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापुढे आमदार नितीन देशमुख यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल, असा इशाराही आमदार सावरकर यांनी दिला आहे.

आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव पाठविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचे आमदार नितीन देशमुख यांचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेच्याच आमदार देशमुख यांनी फडणवीस यांना 'फडतूस' म्हणून संबोधल्याने जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात 'कोल्डवॉर' सुरू झाला आहे. देशमुख यांनी केलेल्या याच वक्तव्याचा आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला.

आमदार देशमुखांना भाजपचे प्रत्युत्तर

आमदार नितीन देशमुख यांचे राजकीय भविष्य अंधकार असल्यामुळे द्वेष बुद्धीने ते सातत्याने केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहेत. देशमुख यांची 'मलाई' बंद झाल्यामुळे जिल्हा परिषद प्रकरणाशी संबंध नसताना केवळ जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी प्रसिद्धीकरिता सातत्याने ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख अशी वक्तव्यं करत असल्याचा आरोप भाजपने(BJP) केला आहे. त्यामुळे यापुढे हा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजप प्रदेश सरचिटणीस, आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे.

कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ढवळाढवळ करत नाहीत. कोणतेही राजकीय द्वेष काम करत नाहीत. सर्वांना सोबत घेऊन सगळ्यांचा सन्मान करतात. मात्र, केवळ राजकीय द्वेषाने भाजपच्या बळावर निवडून आलेले नितीन देशमुख हे अपमान करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केवळ पब्लिसिटी मिळवण्यासाठी सातत्याने आमदार देशमुख अशा प्रकारचा आरोप करत असतात. धोरणात्मक विषयावर टीका हे वेगळे मात्र व्यक्तिगत टीका करणे हा प्रकार निंदनीय असल्याचे भाजपने म्हटले आहे. आमदार देशमुख यांनी यापुढे शद्ब जपून वापरावा, अन्यथा त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते समर्थ आहेत, असा इशाराही देण्यात आला आहे. देशमुख यांनी वापरलेले आपले शब्द मागे घ्यावेत, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील राजकारण तापणार

आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या विधानावर जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. ७ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर येणार असून, शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT