Akola BJP & Congress Sarkarnama
विदर्भ

काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपचे आक्रमक प्रत्युत्तर; पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

भाजपच्या (BJP) १०० पेक्षा अधिक नेते, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत काँग्रेसच्या (Congress) आंदोलनाला प्रत्युत्तर दिले.

सरकारनामा ब्यूरो

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत काँग्रेसवर (Congress) केलेल्या टिकेचे पडसाद बुधवारी अकोल्यात उमटले. काँग्रेसने मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप (BJP) कार्यालयापुढे आंदोलन केले. त्याला भाजपच्या नेत्यांनी घोषणाबाजी करीत प्रत्युत्तर दिले. दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. कोरोनाकाळात महाराष्ट्रावरील ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मजुरांना मोफत रेल्वे तिकीट वाटले. महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप मोदींनी लोकसभेत केला होता. त्याचे पडसाद आज (ता.9 फेब्रुवारी) अकोल्यात उमटले.

भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ काँग्रेसच्या २० पदाधिकाऱ्यांनी महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. काँग्रेसचे पदाधिकारी भाजप कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाल्याने भाजपच्या कार्यालयापुढे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्यांची गर्दी झाली होती. १०० पेक्षा अधिक नेते, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले.

भाजपकडून आक्रमक प्रत्युत्तर

कोणी धमकी देऊन भाजप कार्यालयात घुसून दादागिरीचा प्रयत्न केल्यास तो सहन केल्या जाणार नाही, असा इशारा देत भाजपने काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, गिरीश जोशी, अर्चना मसने, किशोर मांगटे, सागर शेगोकार, अक्षय गंगाखेडकर, जयंत मसने, वसंत बछूका, ॲड. देवाशिष काकड, हरीश काळे, प्रशांत अवचार, सुनीता अग्रवाल, संजय गोडा, संजय जिरापुरे, गीतांजली शेगोकार, राहुल देशमुख, चंदा शर्मा, अक्षय जोशी, सतिश ढगे, विलास शेळके, अजय शर्मा आदींसह १०० पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेसकडून मोदीविरोधात पोस्टरबाजी

काँग्रेसने ‘शर्म करो शर्म करो मोदीजी शर्म करो’, असे पोस्टर हातात घेत घोषणा दिल्या. या आंदोलनात सहप्रभारी जावेद अंसारी, महानगराध्यक्ष डॅा. प्रशांत वानखडे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, महानगर उपाध्यक्ष कपिल रावदेव, नगरसेवक पराग कांबळे, मो. युसुफ, अनंत बगाडे, गणेश कळसकर, रवींद्र तायडे, आकाश सिरसाट, सोमेश डिगे, विठ्ठलराव मोहिते, अजय चव्हाण, इरफान सुलतान, विशाल इंगळे, बेनी पहेलवान आदी सहभागी झाले होते.

भाजपच्या आक्रमकपणापुढे काँग्रेसचे एक पाऊल मागे

राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून थेट भाजप कार्यालयासमोरच आंदोलन करण्याचा आदेश दिला होता. अकोल्यात भाजप कार्यालयापासून जवळपास १०० मीटर लांब आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते-कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ आंदोलन करण्यासाठी जमले होते. मात्र, भाजपचा आक्रमकपणा बघून तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना रस्ता क्रॅास करून अमृतवाडीकडे जाणाऱ्या गल्लीच्या जवळ आंदोलन करण्यास सांगितले. काँग्रेसनेही भाजपचा आक्रमकपणा बघता एक पाऊल मागे येत पोलिसांनी सुचलेल्या स्थळावर आंदोलन केले व लवकरच काढता पाय घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT