देशमुखांनी वसुली सांगितली का? चांदीवाल समितीसमोर वाझेने मारली पलटी

चांदीवाल समितीसमोर बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने देशमुखांबाबत गौप्यस्फोट केला आहे.
Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin Waze
Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin WazeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याने देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला काही दिवसांपूर्वी चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी वाझेने उलटतपासणीत अनिल देशमुखांनी त्याला बार आणि आस्थापणाकडून वसुलीचे आदेश दिले नव्हते, असे म्हटले होते. आता त्याने समितीसमोर नवीन अर्ज केला आहे. या अर्जात त्याने देशमुखांनीच वसुलीचे आदेश दिले होते ,अस उत्तर नोंदवण्याची मागणी केली आहे. वाझेने आधी देशमुखांना क्लिनचिट दिली आणि आता थेट त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin Waze
राणेंची प्रकृती आणखी बिघडली; उलट्यांचा त्रास अन् अशक्तपणाही

सचिन वाझेने अर्जात म्हटले आहे की, देशमुखांच्या सहकाऱ्यांनी मला वसुलीसांदर्भात सूचना केल्या होत्या. मला तळोजा कारागृहात ठेवण्यात आल्यापासून मला गरजेच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. मला गोरेगावच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. देशमुख हे ताकदवान व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही माझ्यावर त्यांच्या काही लोकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्यांची नावे मी घेणार नाही. कारण मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण होईल. माझी अँजिओप्लास्टीा झाल्यानंतरसुद्धा मला वैद्यकीय उपचार देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मला आणि परमबीरसिंह यांना खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं.

Param Bir Singh, Anil Deshmukh, Sachin Waze
बाबा राम रहीमचा 'व्हीआयपी' थाट! सुरक्षेसाठी सहआयुक्त, डीसीपी, एसीपींसह 300 जवान

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com