Shabha Fadanvis, Devendra Fadanvis and Eknath Shinde.
Shabha Fadanvis, Devendra Fadanvis and Eknath Shinde. Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadanvs : भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी डागली शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ...

Atul Mehere

दिवसागणिक मानव - वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात कुणीतरी मरत आहे. वनविभागाने अभ्यास करून दूरगामी उपाययोजना करण्याची गरज आहे. असे न केल्यास मानव-वन्यजीव संघर्ष बाजूला राहील आणि मानव व वनविभागात संघर्ष होईल, अशी भीती भाजप (BJP) नेत्या, माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी व्यक्त केली.

शोभा फडणवीस या माजी विधानपरिषद सदस्य आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या त्या काकू आहेत. असे असतानाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर जबरदस्त उखडल्या आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी थेट शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या कारभारावरच हल्ला चढवला. एकंदरीतच सरकारच्या काही निर्णयांवर त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

मूल हे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. तरीही येथे बसस्थानक चांगल्या दर्जाचे नाही. परिवहन विभागाचा कारभार अतिशय गलथान आहे,असाही आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होत नाहीत. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही, अशा एक ना अनेक विषयांवरून त्यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. त्यामुळे राज्य सरकारला हा घरचा अहेर मानला जात आहे.

वन्यजिवांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला २० लाख रुपये देऊन सरकार आपले हात झटकू शकत नाही. खरे तर जिवाची किंमत काही लाख रुपये होऊच शकत नाही. वाघ, बिबट्यांचा अधिवास सुरक्षित करणे ही पहिली गरज आहे. त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. हल्ल्यात मरण पावल्यानंतर त्यांच्या जिवाची किंमत लावण्यापेक्षा हल्ले होऊच नये, अशी व्यवस्था वनविभागाने करण्याची मागणी शोभा फडणवीस यांनी आज मूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT