Mumbai ward structure News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या प्रभागरचनेबाबतच्या निर्णया विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका ( High Court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आपले मत नोंदवले आहे.
प्रभागरचनेबाबात सरकारच्या अध्यादेशावर अंमलबजावणी नको, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठा धक्का मानले जात आहे. याबाबतची पुढील सुनावणी ही 20 डिसेंबरला होणार आहे. मात्र, आजच्या सुनावणीत न्यायालयाने मांडलेले मत आगामी काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे.
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने प्रभागरचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ठाकरे सरकारने प्रभागांची संख्या ही 227 वरुन 236 वर आणली होती. मात्र, ठाकरे सरकारने तयार केलेल्या प्रभागरचनेवर तत्कालीन सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेही आक्षेप घेतला होता.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रभागरचनेबाबत तक्रार केली होती. ठाकरे सरकारने तयार केलेली प्रभागरचना ही फक्त शिवसेनेच्या फायद्याची आहे, असा आरोप त्यांनी केला होता. संबंधित प्रभागरचना रद्द करुन जुनी प्रभागरचना अंमलात आणावी, अशी मागणी देवरा यांनी केली होती.
शिंदे-फडणवीस सरकारने प्रभाग रचने संदर्भात लगेच निर्णय घेऊन, नवी प्रभागरचना रद्द करत आगामी महापालिका निवडणुकीत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक घेतली जाईल, असे जाहीर केले होते. दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारने नवी प्रभागरचना रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याबाबत दोन्ही गटाकडून चांगलाच युक्तीवाद करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. यावेळी न्यायालयाने आपले महत्त्वपूर्ण मत नोंदवले आहे.
प्रभागरचनेबाबात सरकारच्या अध्यादेशावर अंमलबजावणी नको, असे न्यायालयाने स्पष्ट म्हटले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारसाठी हा धक्का मानला जात आहे. याबाबतचा अंतिम निर्णय आलेला नाही. मात्र, न्यायालयाने मांडलेले मत महत्त्वाचे आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याचिका दाखल केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.