Voting ink Sarkarnama
विदर्भ

Nagpur Graduates constituency : नागपूर पदवीधरमध्ये धक्कादायक प्रकार : मतदानासाठी जांभळ्याऐवजी काळ्या शाईचा वापर, आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मते ठरवली वैध

voting ink News : नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत एका मतदान केंद्रावर जांभळ्या शाईऐवजी काळ्या पेनचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी या केंद्रावरील काळ्या शाईने नोंदवलेली मते वैध ठरवली असून यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur, 27 October : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत एका केंद्रावर मतदान करताना जांभळ्या रंगाऐवजी काळ्या शाईचा वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या केंद्रावर काळ्या रंगाचा पेन वापरण्यात आला. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मते वैध ठरवली आहेत.

पदवीधर मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीसाठी एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांची नोंदणी होती. त्यापैकी १ लाख ६५ हजार ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी प्रशासनाकडून जांभळ्या रंगाची शाई असलेल्या विशिष्ट पेनचा वापर करण्याच्या सूचना होत्या. या निवडणुकीत ६४.७६ टक्के मतदान झाले. एकूण मतदारांपैकी ९० हजारांवर मतदारांनी मतदान केलेले नाही.

नागपूर जिल्ह्यात ६०.३५ टक्के, भंडारा जिल्ह्यात ६७.०७ टक्के, गोंदिया जिल्ह्यात ७१.२९ टक्के, वर्धा जिल्ह्यात ६८.३५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ७३.०५ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदान झाले.

या आकडेवारीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक, तर नागपूर जिल्ह्यात सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली आहे. मतदारांना मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या शाईचा वापर करण्याचे प्रशासनाचे निर्देश होते, त्यानुसार पेनही उपलब्ध करून देण्यात आला होता.

परंतु, गडचिरोलीतील देसाईगंज येथील मतदान केंद्रावर काळ्या रंगाच्या शाईचा पेन उपलब्ध करून देण्यात आला होता. मतदानासाठी त्याचाच वापर करण्यात आला. ही बाब प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून समोर आली.

चारशे मतदारांची मते

या केंद्रावर जवळपास ४०० पेक्षा जास्त मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर चर्चा केली. तर, आयोगाकडून पुरविण्यात आलेल्या शाईचा पेन असल्याने संपूर्ण मत वैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT