

Nagpur, 27 October : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या ८४ हजार मतांची मोजणी पहिल्या फेरीत करण्यात आली. या मतमोजणीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांनी ७ ते ८ हजार मतांची आघाडी घेतली आहे. मात्र, या मतांमध्ये तब्बल दहा ते बारा हजार मते अवैध ठरली आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीस आज दुपारी एक वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीत ८४ टेबलवर ८४ हजार मतांची मोजणी सुरू होती. मतमोजणीत सुरुवातीपासून अभिजित वंजारी यांनी आघाडी घेतली होती.
भारतीय जनता पक्षाचे सुधाकर कोहळे काही टेबलवर आघाडीवर होते. याशिवाय अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनीही तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. त्यामुळे सामना अभिजित वंजारी, सुधाकर कोहळे आणि नितेश कराळे यांच्यात रंगला आहे. अद्याप ८४ हजार मतांची मोजणी झालेली नाही. ती लवकरच सुरू होणार आहे.
दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार
सध्याच्या मतमोजणीतील कल लक्षात घेता निवडणुकीचा निर्णय दुसऱ्या पसंती क्रमावर होणार आहे, त्यामुळे मतमोजणीचा अंतिम निकाल लागण्यास बराच उशीर होण्याची शक्यता आहे.
दहा हजार मते अवैध
पदवीधरांच्या निवडणुकीच्या मतमोजणीत मते अवैध ठरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ८४ हजार मतांच्या मोजणीत तब्बल दहा हजारांवर मते अवैध ठरली आहेत.
कराळे मास्तर सुसाट
पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत अपक्ष असलेले नीतेश कराळे यांनी सुसाट वाटचाल केली आहे. ८४ हजाराच्या मतमोजणीत कराळे गुरुजींनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचे दिसून आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.