Narendra Bhondekar - Parinay Phuke Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Politics : भंडाऱ्यात महायुतीत बिघाडी, आमदार भोंडेकर म्हणाले, माजी मंत्री फुकेंमुळे अनेकांनी भाजप सोडला !

Narendra Bhondekar Vs Parinay Phuke : भाजपचे नेते असलेल्या फुके यांचा जुना इतिहास असा आहे की, त्यांच्या पक्षातून अनेक नेते सोडून गेलेत. मी देखील भाजपमध्ये जाणार होतो. पण तेथे गेलो असतो तर फुके यांच्यामुळे वाद झाले असते, ते टाळण्यासाठी भाजपमध्ये गेलो..

Chaitanya Machale

Bhandra News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपचे माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

फुके यांच्यामुळे अनेक नेते भाजपला रामराम करून बाहेर पडले असल्याचा आरोप भोंडेकर यांनी केला. नेते पक्ष का सोडून जातात, लोकसभेच्या निवडणुकीत आपला पराभव का झाला, याचे आत्मपरिक्षण फुके यांनी करावे, असेही भोंडेकर म्हणाले.

राज्यात सत्तापरिवर्तन होताना भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपला पाठींबा दिला होता. मंगळवारी त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भंडाऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार भोंडेकर यांनी दिले नव्हते. कार्यक्रमाच्या नियोजनात देखील आपल्याला घेण्यात आले नव्हते, अशी टीका भाजपचे माजी मंत्री फुके यांनी सोशल मीडियावर केली होती. त्याला आमदार भोंडेकर यांनी प्रत्युत्तर देत फुके यांना सुनावले आहे. यामुळे भंडाऱ्यात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार भोंडेकर म्हणाले, महायुतीच्या सगळ्याचं नेत्यांना,पदाधिकारी यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होत, विनंती देखील केली होती आणि फोन सुद्धा करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी परिणय फुके यांचं नाव सुद्धा आरक्षित करून पास सुद्धा पाठविण्यात आले होते. मी स्वतः फुकेंना कॉल लावला होता. त्यांच्या काही व्यस्त कामामुळं ते आले नसतील.

भाजपचे आणि राष्ट्रवादीचे काही लोकं आली होती. 547 कोटी हा शासनाचा निधी प्राप्त झाला. हा जिल्ह्याच्या विकासाच्या विकासाचा कार्यक्रम होता. त्यामुळं एखाद्यानं रुसवा फुगवा ठेवण्यापेक्षा त्याला विकासाच्या दृष्टीनं बघायला पाहिजे, असा टोलाही आमदार भोंडेकर यांनी लगावला.

भाजपचे (BJP) नेते असलेल्या फुके यांचा जुना इतिहास असा आहे की, त्यांच्या पक्षातून अनेक नेते सोडून गेलेत. मी देखील भाजपमध्ये जाणार होतो. पण तेथे गेलो असतो तर फुके यांच्यामुळे वाद झाले असते, ते टाळण्यासाठी भाजपमध्ये गेलो नसल्याचे आमदार भोंडेकर म्हणाले. नेते भाजप सोडून का जातात. परत का येत नाहीत, याचे आत्मपरिक्षण फुके यांनी करावे, असा सल्लाही भोंडेकर यांनी दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT