BJP Vs Shivsena : भंडाऱ्यात महायुतीत ठिणग्या आणि फटाके

Dispute in mahayuti in Bhandara : लोकसभेतील पराभव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Bhandara News, 26 June : लोकसभेतील पराभव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. एकीकडे भाजपचे नेते आपसात भांडत आहेत.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलावले नसल्याने शिंदे सेना आणि भाजपमध्ये शाब्दिक खंडाजंगी सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच भंडारा जिल्ह्यातील 102 कोटी रुपयांचे गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाचे तसेच 547 कोटींच्या आठ विविध विकास कामाचे भूमिपूजन केलं.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांच्याच पुढाकाराने भंडारा जिल्ह्यात निधी मिळाला. असे असताना नाम फलकावर त्यांचे नाव टाकण्याचे आणि त्यांना बोलावण्याचे सौजन्य दाखवण्यात आले नसल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. याचा जाहीर निषेधही भाजपने नोंदवला आहे.

लोकसभेत भाजपचे उमेदवार सुनील मेंढे पराभूत झाले आहेत. तत्पूर्वी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार व पदाधिकारी आता उघडपणे बोलायला लागले आहेत. माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्यामुळे भंडारा जिल्ह्यात भाजपचा पराभव झाल्याचा आरोप केला जात आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपद मिळताच अंदाजही बदलला; 'टी-शर्ट'मधील राहुल गांधी संसदेत...

ते पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात आले तेव्हापासूनच भाजपची घडी विस्कटली. अनेकांनी पक्ष सोडला. जिल्हा परिषद हातातून गेली. लोकसभेचीही जागा गमावली. भंडारा जिल्ह्याचील पवनीचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. आपण भाजपमध्ये जाणार होतो. मात्र परिणय फुकेंमुळे शिंदे सेनेत प्रवेश केला असे सांगून त्यांनी असंतोषात आणखी भर टाकली आहे.

विशेष म्हणजे, फुके नागपूरचे असताना त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून पाठवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजू जैन यांचा त्यांनी पराभव केला होता. युतीच्या सरकारमध्ये ते वनराज्यमंत्री होते. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Imtiaz Jaleel : 'ओवेसींना शुभेच्छा, पण...', इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली खंत

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात ते साकोलीतून लढले होते. ते पराभूत झाले. विधान परिषदेचा त्यांचा कार्यकाळसुद्धा संपला आहे. भंडारा लोकसभेचे उमेदवार म्हणून परिणय फुके यांचे नाव आघाडीवर होते. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे आता नागपूरचे पार्सल परत घेऊन जा अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते करायला लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com