K. Chandrashekhar Rao Sarkarnama
विदर्भ

BRs News : बीआरएसची वाढती लोकप्रियता बघून विरोधकांकडून षड्यंत्र !

Maharashtra : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रामध्ये एंट्री करून विस्तारात वेग पकडला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Many leaders from Maharashtra are joining BRS : महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाची लोकप्रियता वाढत आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. महाराष्ट्रात पार्टीला चांगले यश मिळू लागले आहे. याचा धसका घेऊन विरोधकांकडून षड्यंत्र रचले जाऊ लागले आहेत. (Conspiracies are being hatched by the opponents)

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रामध्ये एंट्री करून विस्तारात वेग पकडला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व जनतेच्या उद्धारासाठी त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे औचित्य साधून के. चंद्रशेखर राव हे त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत.

उद्या (ता. २७) रोजी दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचा पंढरपुरात (Pandharpur) बीआरएसमध्ये प्रवेश पण होणार आहे. केसीआर यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आज सुरुवात झाली आहे. धाराशिवच्या उमरगा येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला.

दरम्यान या नियोजित ठिकाणी काही विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेशभूषा बदलून के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या नियोजनासाठी आलेल्या परिसरातील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्या जेवणावळी मांसाहारी जेवण असल्याचा खोटा प्रचार करून प्रसार माध्यमांना घेऊन चुकीच्या ठिकाणांचे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. हा केसीआर यांच्या दौऱ्याला गालबोट लावण्यासाठी रचलेले षड्यंत्र असल्याचा आरोप बीआरएसचे सोशल मीडिया प्रमुख जयंत देशमुख यांनी केला आहे.

के. चंद्रशेखरराव उद्या (ता. २७) विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. पण या दौऱ्याला काही विरोधी पक्षांतील लोक गालबोट लावण्याचा कट व षड्यंत्र रचत आहेत आणि दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री (Chief Minister) के. चंद्रशेखरराव यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दरम्यान या दौऱ्याला महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने जास्तीत जास्त सुरक्षा द्यायला हवी जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT