Buldhana Bus Accident Sarkarnama
विदर्भ

Buldhana Bus Accident: बुलढाणा बस अपघाताचा 'तो' अहवाल आला; आगीचे कारण स्पष्ट

Vidarbha News: समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशाचा मृत्यू झाला.

सरकारनामा ब्यूरो

Bhuldhana Bus Accident Forensic Report : समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेचा मुंबईच्या फॉरेन्सिक फायर ॲण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास करुन अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या अहवालात आगीचे खरे कारण पुढे आले आहे.

या अहवालानुसार, मध्यरात्री अपघात रात्री १.३२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी, बसमध्ये ३५० लिटर डिझेल होते. अकरा-साडेअकराच्या सुमारास बस समृद्धी महामार्गावर आली. ७० ते ८० किलोमीटर प्रति तास बस धावत होती. महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये म्हणजे ओवरटेकिंग लेनमध्ये धावत असताना अचानक बसचे समोरचे चाक रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्ड आणि नंतर थोड्या अंतरावर असलेल्या दुभाजकालाही धडक झाली. (Buldhana Road Accident)

बसचा पाठीमागचे चाकही त्याच पद्धतीने धडकल्याने बस एका दिशेने झुकली. या दोन्हीही धडका एवढ्या वेगाने झाल्या बसचा मागचा टायर फुटला आणि टायरच्या आतील लोखंडी रिंग ही मोडली. चाके दुभाजकाला धडकल्याने बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. (Buldhana)

ज्या बाजूला बसचा दरवाजा होता तीच बाजू नेमकी जमिनीवर कोसळल्याने मुख्य दरवाजाच बंद झाला. फॉरेन्सिक फायर अहवालाप्रमाणे बस एकाच बाजून झुकून पडल्याने बसचा एक्सेल तुटून वेगळा झाला. तोच एक्सेल डिझेल टँकवर आदळला. (Accident) यामुळे ३५० लिटर डिझेल उडाले. डिझेल टँकच फुटून ते डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले, त्यामुळे बसने मोठा पेट घेतला. याच आगीत होरपळून २५ जणांनी आपले प्राण गमावले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT