NCP Crisis Nashik : शरद पवार आणि भुजबळ समर्थक भिडले, घोषणाबाजी!

पोलीस बळाच्या जोरावर भुजबळ समर्थकांनी कार्यालय बळकावल्याचा आरोप
Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

NCP Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये काल सायंकाळी भुजबळ समर्थकांनी राष्ट्रवादी भवनचा ताबा घेतला होता. आज दुपारी शरद पवार समर्थकांनी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावरून प्रचंड घोषणाबाजी झाली. झटापट झाली. पोलीसांनी शरद पवार समर्थकांना अडवल्याने वातावरण तापले. (Sharad Pawar followers Shouts slowgun against Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी बंडखोरी करीत आपणच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा दावा केला. त्यानंतर आज शरद पवार समर्थकांनी कार्यालयात जाऊन बैठक घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भुजबळ समर्थकांनी त्यांना अडवल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
NCP Ajit Pawar Politics : शपथविधीनंतर अजित पवार पहिल्यादाच मंत्रालयात ; पाहा खास फोटो !

आज दुपारी शरद पवार समर्थकांनी बैठक घेण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात गेले. तेव्हा मोठा वाद झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी नगरसेवक गजानन शेलार यांसह विविध पदाधिकारी होते. मात्र त्यांना अडवण्यात आले. त्यामुळे शेलार समर्थकांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्या. ईडीच्या नावाने देखील घोषणा दिल्या.

या सर्वांना छगन भुजबळ समर्थकांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यांना प्रतिबंध केल्याने वाद वाढला. पोलीसांनी शरद पवार समर्थकांना कार्यालयात येऊ दिले नाही. त्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी श्री. शेलार यांनी हे कार्यालय राष्ट्रवादी प्रतिष्ठानचे आहे. भुजबळ यांचा काहीही संबंध नाही. सगळे नेते आमचेच आहेत. मात्र आम्ही शरद पवार यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. हा पक्ष त्यांचाच आहे.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ समर्थकांनी घेतला राष्ट्रवादी भवनचा ताबा!

दरम्यान कोंडाजी मामा आव्हाड म्हणाले, पोलीसांवर मोठे दडपण आहे. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसावे लागत आहे. आम्ही ठामपणे शरद पवार यांच्यासोबत आहोत. कोणत्याही स्थितीत जातीयवादी व देशात धार्मिक वाद निर्माण करणाऱ्या भाजपबरोबर जाता कामा नये. महात्मा फुलेंच्या विचाराच्या विरोधात असल्याची टिका त्यांनी केली.

दरम्यान भुजबळ समर्थक दिलीप खैरे यांनी हे कोण लोक आहेत, हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही कार्यालयात येऊ देणार नाही. त्यांची बैठक असेल तर त्यांनी मुंबईला बैठक होणार असल्याची माहिती घ्यावी असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com