Dhangar's Sheep Sarkarnama
विदर्भ

Dhangar Community March : मेंढ्यांसह धनगर समाजाने या मागणीसाठी दिली तहसील कार्यालयावर धडक...

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर नेत्यांनी भंडारा उधळला होता.

Atul Mehere

Buldhana Political News : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुका प्रशासनासाठी सोमवारचा (ता. २५) दिवस चांगलाच धावपळीचा ठरला. धनगर समाजाच्या नागरिकांनी मेंढ्यांसह तहसील कार्यालयावर धडक दिल्याने पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या धनगर समाजबांधवांची प्रमुख मागणी होती आरक्षणाची. (Radhakrishna Vikhe Patil was attacked by Dhangar leaders)

धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सध्या राज्यात आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यातील मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर नेत्यांनी भंडारा उधळला होता. त्यावरून वादावादीही झाली. आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा पेट घेत आहे. त्यातूनच बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात धनगर समाज बांधवांना तहसील कार्यालयाच्या परिसरात मेंढ्या आणल्याने पोलिसांना गर्दी आवरावी की मेंढ्या, असा प्रश्न पडला होता. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण प्रमाणपत्र मिळावे, ओबीसी आरक्षणातून अन्य कोणालाही वाटा देण्यात येऊ नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, धनगर कार्यकर्ते शेखर गंगाले यांना झालेल्या मारहाणीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर माफी मागावी, मेंढपाळांना चराईसाठी पासेस देण्यात यावेत, अशा मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.

फकिन जाधव, बाळू म्हस्के, बाबासाहेब म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, सुनील म्हस्के, भुजंग जाधव, किशोर म्हस्के, कोंडिबा जाधव, शांताराम म्हस्के, गंगाधार कुंडकर, गणेश म्हस्के, रामदास जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

नेमके काय आहेत प्रश्न?

तेलंगणा राज्याने एस.टी. संवर्गासाठी सहा टक्केचे आरक्षण दहा टक्के केलं. या आधारावर धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाच्या जात प्रमाणपत्रांची मागणी होत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

याच मुद्द्यावर राणी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंच, ईश्वर ठोंबरे आणि पुरुषोत्तम धाखोले यांनी तीन स्वतंत्र रीट याचिका दाखल केल्या आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवगार्तून (एस.टी.) आरक्षण द्यावं, अशी या समाजाची जुनी मागणी आहे. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून (एनटी) आरक्षण आहे.

अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून, इंग्रजीमध्ये ‘आर’ ऐवजी ‘डी’ असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘ड’ ऐवजी ‘र’ असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT