Govind Pansare Shivaji book issue Sarkarnama
विदर्भ

Govind Pansare Shivaji book issue : ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद पेटताच; पुस्तकाचे वाचन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर संजय गायकवाड समर्थक धावले

Tension erupts in Buldhana as Eknath Shinde-led Shiv Sena supporters and Youth Congress workers confront each other near Shivaji Maharaj memorial over a controversial book reading : शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक भिडले.

Pradeep Pendhare

Buldhana clash news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचून सुद्धा एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, दिवंगत लेखक गोविंद पानसरे लिखित, शिवाजी कोण होता? यावरून वाद पेटताच ठेवताना दिसत आहेत.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात पुस्तक वाचन करत असताना, तिथं आमदार गायकवाड समर्थक पोहोचत निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी होत, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला.

दिवगंत लेखक गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि त्यातील मजकुरावरून, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी संताप व्यक्त केला आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना जिवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या कुटुंबातील महिलांविषयी अपशब्द वापरले. त्याची चित्रफीत समाज माध्यांवर व्हायरल होताच, त्यावरून पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या.

पुरोगामी संघटनांनी काल बुलढाणा इथं शिवाजी कोण होता? या पुस्तकाचं वाचन ठेवलं. या उपक्रमाला राज्यभरातील पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते, विचारवंत सहभागी झाले होते. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी देखील सहभागी झाले होते. परंतु पोलिसांनी त्यांच्यासह 12 ते 15 जणांना ताब्यात घेत स्थानबद्ध केलं. पुढचा संघर्ष टाळण्याचा पोलिसांनी (Police) प्रयत्न केला.

तत्पूर्वी, आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत, शिवाजी कोण होता? पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांच्याविरोधात मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच प्रकाशक प्रशांत अंबी, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करा आणि पुस्तक छपाईसाठी परदेशी पैसा येतोय का?, याची देखील चौकशी करण्याची मागणी केली. या मुळे तणावात आणखीच वाद उफाळला.

बुलढाण्यात भारतीय कम्युनिस्ट आणि इतर डाव्या संघटनांकडून, आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाण्यातील आंदोलन चिरडल्या गेल्याचा आरोप होत आहे. हा तणाव थांबला नसतानाच, आज पुन्हा आमदार गायकवाड समर्थक आणि युवक काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

युवक काँग्रेसच्यावतीने बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन सुरू होते. कार्यकर्ते पुस्तक वाचन करत होते. त्यावेळी आमदार गायकवाड समर्थकांनी तिथे निदर्शने सुरू केली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते थेट आमने-सामने आले अन् जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

प्रचंड घोषणाबाजी सुरू असतानाच आमदार गायकवाड समर्थक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर धावून जाऊ लागले. याचवेळी पोलिसांनी मध्यस्थी केली अन् आमदार गायकवाड यांच्या समर्थकांना अटकाव केला. या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT