Govind Pansare controversy : गोविंद पानसरेंविरोधात मरणोत्तर FIRची मागणी; आमदार गायकवाडांच्या पावलाने नवा राजकीय वाद पेटला!

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad demands posthumous case against Govind Pansare and action against Kolhapur-based publisher over the book “Shivaji Kon Hota” : एकनाथ शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता पुस्तकांवरून क्राॅ. गोविंद पानसरेंविरोधात मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीने खळबळ उडाली आहे.
Shivaji Kon Hota book row
Shivaji Kon Hota book rowSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Shiv Sena news : शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून वाद उकरून काढणारे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

या पुस्तकावरून त्यांनी, लेखक दिवंगत गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा. तसेच प्रकाशक प्रशांत अंबी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्हा प्रशासनाला निवेदन देत, पुस्तकासंदर्भात वेगवेगळे मुद्दे उरकरून काढले आहेत. हे निवेदन देताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) विजय अंभोरे, संदीप गायकवाड, धनंजय बारोटे, संजय हाडे, विजयसिंह राजपूत, जिजा राठोड, अनुजा सावळे, आशीष जाधव, श्रीकांत गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत. विशेष म्हणजे यातील काहींनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी निवेदनात, पुस्तकाला विदेशातून आर्थिक मदत मिळाली आहे का, हे तपासावे. पुस्तक छापणारा, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख दिसतो आहे. त्यानुसार लेखक, लेखकाच्या मृत्यूनंतर पुस्तक छपाई करणाऱ्या प्रकाशक प्रशांत अंबी याला अटक करावी, अशी मागणी केली आहे.

Shivaji Kon Hota book row
Satyajeet Tambe vs Sanjay Gaikwad : ‘लोकप्रतिनिधी कसा नसावा!’ सत्यजीत तांबेंचा शिवसेनेच्या गायकवाडांवर निशाणा

लेखक व प्रकाशक यांनी आर्थिक फायदा मिळावा यासाठी पुस्तकाराद्वारे महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे, असा आरोपही आमदार गायकवाड यांनी केला आहे. आमदार गायकवाड यांच्या या निवेदनामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Shivaji Kon Hota book row
Govind Mokate Bypoll History : गोविंद मोकाटेंचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकॉर्ड भारी'; 'राहुरी'च्या निकालाची वाढली धडधड!

दरम्यान, आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना दूरध्वनीद्वारे दिलेल्या धमकीवरून, कोल्हापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आमदार गायकवाडांविरोधात अदखलपात्र गु्न्ह्याची नोंद झाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी या तक्रारीवर विधीतज्ज्ञांचे म्हणणे मागवले आहे.

आमदार गायकवाड यांनी प्रकाशक अंबी यांना दिलेल्या धमकीची ध्वनिफित चांगलीच व्हायरल झाली आहे. यातील संभाषण गंभीर आहे. अंबी यांना जिवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी वादग्रस्त विधानं करण्यात आली आहेत. यानंतर अंबी यांना धमक्यांचे फोन सुरूच आहे. तसेच या ध्वनिफितीत छत्रपतींचा देखील अवमान झाल्याचे निरीक्षण प्रकाशक अंबी यांचे वकील असीम सरोदे यांनी तक्रारीत म्हटलं असून, सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com