Sanjay Kute, Prataprao Jadhav and Sanjay Gaikwad Sarkarnama
विदर्भ

Buldhana Lok Sabha Election : संजय गायकवाडांनंतर आमदार कुटेंचाही गौप्यस्फोट, म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Buldhana Lok Sabha Election : शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारीसाठी अर्ज भरल्यानंतर मोठी खळबळ उडाली. खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. नंतर काल महायुतीच्या मेळाव्यात आमदार गायकवाडांनी आपल्या त्या कृतीचा खुलासा केला. त्यानंतर जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी गौप्यस्फोट केला.

बुलडाणा लोकसभेची जागा ही शिवसेनेलाच सुटणार आणि उमेदवार खासदार प्रतापराव जाधव हेच असणार आहेत, हे मला एक महिन्याआधीच माहीत होते. त्यामुळेच ही जागा भाजपने मागितली नसल्याचे माजी मंत्री तथा भाजपचे नेते आमदार संजय कुटे यांनी म्हणाले. बुलडाण्यात काल शुक्रवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी उपरोक्त खुलासा केला.

मेळाव्यात आमदार संजय कुटेंचे भाषण चांगलेच गाजले. या वेळी आमदार कुटे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काल बुलडाणा येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी तडकाफडकी उमेदवारी अर्ज भरण्यामागची भूमिका प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना स्पष्ट केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपली निवडणूक लढविण्याची कोणतीही योजना नसून, मी पक्षाकडे तसा कोणताही अर्ज केलेला नाही. पण, मला जे साध्य करायचे होते, ते केले आहे. जे काम करत नाहीत, लोक ओळखत नाहीत, असे लोक निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत, असे गायकवाड म्हणाले.

मी तर चोवीस तास काम करतो. जाधवांशी भेट झाली परंतु अर्ज मागे घेण्यावर चर्चा झाली नाही, असे सांगून आमदार गायकवाड यांनी सस्पेन्स निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता. दरम्यान, शुक्रवारी बुलडाणा येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आमदार गायकवाड यांनी आपल्या भाषणातून खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. या विषयावर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी अत्यंत पद्धतशीरपणे आमदार संजय गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर निशाणा साधत या विषयावर थेट नामोल्लेख न करता उत्तर दिले.

आमदार कुटे म्हणाले की, उमेदवार कोण हे मला एक महिन्यापूर्वीच माहीत होते. डॉ. शिंगणे आणि मी वरिष्ठांच्या संपर्कात होतो. तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आमचं व्हिजन क्लीअर होतं. कार्यकर्ते संभ्रमात होते. त्यांना वाटायचं हे भाजपला उमेदवारी का नाही मागत? त्यावेळी मी शांत होतो कारण आधीच माहिती होते की, खासदार प्रतापराव जाधव हेच उमेदवार राहतील, असे आमदार कुटे म्हणाले.

मतदारसंघात भाजपने कोणताही सर्व्हे केला नाही. खासदार जाधव नंबर एकवर होते आणि नंबर एकवरच राहतील, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या विकासामध्ये खासदार जाधवांचा मोठा वाटा आहे. खासदारांना देशासाठी काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना जिल्ह्यात जास्त फिरता येत नाही, मात्र तरीही जिल्ह्यात सर्वाधिक संपर्क असलेला नेता म्हणजे खासदार प्रतापराव जाधव आहेत, असे आमदार कुटे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT