Buldhana Lok Sabha Constituency : शिवसेना शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड त्यांची वादग्रस्त वक्तव्यं आणि कृतीमुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या भूमिका ते बिनधास्त मांडत असतात. काल त्यांनी अचानकपणे बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेत तर्कवितर्क लावण्यात आले आणि चर्चांना उधाण आले. आज आमदार गायकवाड यांनी याचा खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार हा त्यांचा गेम प्लान होता.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी काल (ता. 28) सायंकाळी शिवसेनेकडून जाहीर झालेल्या आठ उमेदवारांच्या यादीमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, मी भाजपवर दबाव टाकण्यासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा गौप्यस्फोट बुलडाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.
काल सकाळपासून बुलडाणा लोकसभेत महायुतीचा उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नव्हती. अशात शिंदे गट शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे बुलडाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय गायकवाड यांनी अपक्ष आणि पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर येत आहे. आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी उमेदवारी अर्ज भरल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यासंदर्भात पक्षाचे निरीक्षक विलास पारकर यांनी सावध भूमिका घेत आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने मतदारांमध्ये महायुतीसंदर्भात संभ्रम निर्माण झालेला होता. दरम्यान, आज (ता. 29) शुक्रवारी बुलडाणा येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणातून खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे.
आमदार गायकवाडांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. दरम्यान, मेळावा संपताच आमदार संजय गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या समोर मोठा गाैप्यस्फोट केला. ते म्हणाले की, काल उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली आणि हाच आपला गेम प्लान होता. निवडणुकीची रणनीती होती, असे ते म्हणाले.
आमदार संजय गायकवाड यांच्या या खुलाशामुळे कालपासून बुलडाणा जिल्हा आणि राज्यामध्ये बुलडाण्यातील शिवसेनेमध्ये फूट निर्माण झाली, असे जे चित्र निर्माण झाले होते. त्याला आज पूर्णविराम मिळाला. एकंदरीत कालपासूनच्या घडामोडी म्हणजे आमदार संजय गायकवाड यांचा गेम प्लान होता, हे दिसून येते.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.