Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana  Sarkarnama
विदर्भ

Ladki Bahin Yojana Form: लाडकी बहीण योजना पुन्हा वादात; 'हे'अर्ज रद्द होणार? मनसैनिक आक्रमक

Mangesh Mahale

Buldhana News: शिंदे-फडणवीस-पवार सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली 'लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सरकारच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा वादात सापडली आहे. मराठीतून अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना योजनेपासून वंचित राहावे लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मराठीतून भरलेले लाभार्थींचे अर्ज रद्द करण्यात यावे, अशा लेखी सूचना प्रशासनाने दिल्यामुळे मराठीतून भरलेले लाखो अर्ज रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठीतून अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींना (Women Application) न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे सरकारच्या विरोधात मैदान उतरली आहे.

आता हे अर्ज बाद होण्याच्या भीतीने व मराठी भाषेचा अपमान होत असल्याच्या भावनेने मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ्याफिती लावून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.मनसेकडून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या योजनेत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केला आहे. या महिलांना आता पात्रता यादीची प्रतिक्षा लागली आहे.

महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी राज्य सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. जयंतरावांनी डॉन चित्रपटाचा दाखला देत सरकारची खिल्ली उडवली आहे.

जयंत पाटलांकडून डॉन चित्रपटाचा डायलॉग ९० च्या दशकात प्रचंड गाजलेल्या सिनेमातील रिकाम्या रिव्हॉल्व्हरच्या सीनचा दाखला देत त्यांनी सरकारच्या...मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि रिकामी तिजोरी यासाठी दिला आहे. तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे ट्विट करून सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार...यांनाही जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT