Arun Gawli News: 'डॅडी'ला सुट्टी नाहीच!कारागृहातील मुक्काम वाढला; काय आहे प्रकरण

Supreme Courts Refusal to Grant Leave on Parole to Arun Gawli : मुंबई मधील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसेच इतर गुन्ह्यांमध्ये गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. तो नागपूरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
Arun Gawli
Arun GawliSarkarnama
Published on
Updated on

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) याला पॅरोलवर सु्ट्टी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. आज कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नाही. नोव्हेंबर महिन्यात कोर्ट हे प्रकरण ऐकणार आहे.

अरुण गवळीला तुरुंगातून सुट्टी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. त्याला 2012 मध्ये कोर्टाने मोक्का अंतर्गत 40 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सध्या अरुण गवळी(डॅडी) नागपूरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. यापूर्वी काही घरगुती समारंभासाठी तो तुरुंगातून काही दिवस बाहेर आला होता. गवळी कायमचा तुरुंगाच्या बाहेर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. 2006 च्या शासन निर्णयाची मदत घेत तो बाहेर येणार होता.

राज्य सरकारच्या 2006 च्या शासन निर्णयाचा आधार घेत गवळी याने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्याच्या या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी गवळीला सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

Arun Gawli
Pune Porsche Car Accident Case : 4 तास कसून चौकशी, 900 पानांचे चार्जशीट, पण आमदार टिंगरे यांचे आरोपपत्रात नाव नाही?

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीवर खंडणी, खून, अपहरण, धमकी असे विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई (Mumbai) मधील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसेच इतर गुन्ह्यांमध्ये गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. कमलाकार जामसंडेकर यांच्या हत्येची सुपारी अरुण गवळीने दिल्याचे न्यायालयात उघड झाले आहे. अरुण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता.

Arun Gawli
Sudhir Patil Join Shiv Sena: मराठवाड्यात CM शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का; सुधीर पाटलांनी हाती घेतला 'धनुष्यबाण'

महाराष्ट्र सरकारचा 2006 चा निर्णय काय आहे?

  1. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय 65 पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल...

  2. गवळीचा जन्म 1955 चा असल्याने त्याचे वय सध्या 70 वर्षे आहे..

  3. जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून तुरुंगात असल्याने गेली सोळा वर्षे तो तुरुंगात आहे.

  4. म्हणजेच वर्ष 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो...

  5. न्यायालयाने त्याची शिक्षातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी, असा निर्णय दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com