Sanjay Gaikwad News : Buldhana
Sanjay Gaikwad News : Buldhana Sarkarnama
विदर्भ

Buldhana News: शिंदे गटाचे आमदार गायकवाडांची शेतकऱ्याला शिवीगाळ : म्हणाले, 'ऑडिओ माझा नाहीच..'

सरकारनामा ब्यूरो

Buldhana News : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय गायकवाड हे फोनवर संवाद साधताना एका शेतकऱ्याला अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये शेतकरी असलेले अनिल गंगित्रे यांनी गायकवाड यांना फोन केला होता.

उपसा जलसिंजन योजनेचे रखडून पडलेले कामाबाबात शेतकरी गंगतरे यांनी गायकावाडांना फोन केला. 'बोदवड उपसा जलसिंचनाचं काम कधी होणार?'असा सवाल त्यांनी गायकवाड यांना विचारला. शेतकऱ्याच्या या प्रश्नांमुळे आमदार गायकवाड वैतागले. सुरूवीतीला त्यांनी शेतकऱ्याची समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

गायकवाड शेतकऱ्याला म्हणाले, 'बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 1100 कोटींचा निधीही मी मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे. मार्च महिन्यात योजनेचे काम सुरुही होईल. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका, असे गायकवाड म्हणाले.

दरम्यान, या ऑडिओ क्लिपसंदर्भात गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. हे व्हायरल होणारे क्लिप आपले नाही, असे त्यांनी म्हंटले. तसेच, आपण या संबंधित शेतकऱ्याशी या योजनेबाबत अर्धा तास बोललो. मात्र, प्रसार माध्यमांमध्ये फक्त दोनच मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, असा दावाही संजय गायकवाड म्हणाले.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण -

संजय गायकवाड – तुम्हाला काही समजतं का नाही बाबा ? जर समजत नसेल तर असले तमाशे बंद करा. नौटंकी बंद करा.

अनिल गंगत्रे – तमाशाचं कामच नाही हो साहेब, आम्हाला माहिती आहे.

संजय गायकवाड – तुमच्याकडे चुकीची माहिती दिली गेलीये. माझ्याकडे या मी तुम्हाला दाखवतो सर्व रेकॉर्ड्स...

अनिल गंगित्रे – अधिकारी आम्हाला चुकीची माहिती कशी देतील? ते काम करतात त्यावर. ते कशी चुकीची माहिती देणार ते सांगा साहेब.

संजय गायकवाड – अरे कोणता अधिकारी तो, नाव सांग तू..

अनिल गंगित्रे – नाव कसं काय सांगणार साहेब. ते आम्हाला मदत करतात आणि आम्ही तुम्हाला त्यांचं नाव सांगायचं कसं. त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर चढायचं.

असं थोडी होतं. तुम्ही पण प्रयत्न करताय आम्ही पण प्रयत्न करतोय.

संजय गायकवाड – ही पद्धत नाही ना नौटंकी करायची.

अनिल गंगित्रे – साहेब, नौटंकी तुम्हाला वाटतेय पण, आम्हाला त्रास भोगावा लागतोय. म्हणून आम्ही इथे आलो.

संजय गायकवाड – ही तुमची शंभर टक्के नौटंकीच आहे. तुम्हाला योजना समजत नाही.

अनिल गंगित्रे – साहेब मी पण विचारलं आहे. ते स्ट्रक्चर मिरी ऑफिसला नाशिकला अडकलं आहे. ते मंजूर झालं तर टेंडर निघेल. तुम्ही पण माहिती घ्या पुन्हा काम करतोय

संजय गायकवाड – चाळीस वर्ष आम्ही काम करतोय तु मला नको शिकवू

अनिल गंगित्रे – कुणी काम केलं नाही म्हणून आम्ही करतोय. मला जर असं वाटलं असतं तुम्ही करताय. प्रोग्रेस दिसली असती तर कशाला आलो असतो.

संजय गायकवाड – तुम्ही केली म्हणता ना (शिवी)

अनिल गंगित्रे – हे शब्द कोणते वापरताय साहेब तुम्ही. मी तुम्हाला शिवी दिली का?

संजय गायकवाड – नीट बोल ना मग

अनिल गंगित्रे – मी शिवी दिली का तुम्हाला?

संजय गायकवाड – अरे तुला ( शिवी)

अनिल गंत्रित्रे – तुम्ही आमदार आहात तुम्हाला समजतंय का तुम्ही कोणती भाषा वापरताय.

संजय गायकवाड – तु मला शिकवतोय का? (शिवी)

अनिल गंगित्रे – तुम्ही असे गैरवर्तणूक करत असाल तर काय लोकांची कामं करत असाल.

संजय गायकवाड – अरे सोड रे तू नको आम्हाला शहाणपणा शिकवू ((शिवी)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT