Bus Accident. Sarkarnama
विदर्भ

Samruddha Highway : ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

Bus Accident : अमरावतीच्या तळेगाव दशासरजवळील घटना

Amar Ghatare

Samruddha Highway : भरधाव ट्रॅव्हल्सने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. गुरुवारी (ता. 25) समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले. ट्रॅव्हल्सच्या चालकाला डुलकी आल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी हा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हलच्या चालकाला झोप लागल्याने बस बाजूच्या कंटेनरला धडकली. अपघातात ट्रॅव्हलचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातात तिघांचा मृत्यू झाला. ट्रॅव्हल्स नगरवरून रायपूरकडे जात होती. त्यावेळी ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक बसली. अमरावती जिल्ह्यातील वाढवणा-शिवनीदरम्यान हा अपघात घडला.

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात हे रात्री किंवा पहाटेच्या सुमारास घडलेले आहेत. अनेकदा या वेळेत चालकाला डुलकी येते. त्यात ठरवून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा वाहनांचा वेग अधिक असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे होणारे अपघात हे भीषण असतात. समृद्धी महामार्गावर एवढ्या वेगाने जी वाहने चालवली जातात, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

समृद्धी महामार्गावर काही महिन्यांपूर्वी बसच्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसचा अपघात झाल्यानंतर बसला आग लागल्याची घटना घडली होती. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. बुलढाणा जिल्ह्यतील पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बसने पेट घेतला. बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बस उलटल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला दबला होता. काही प्रवासी मागच्या बाजूने बाहेर पडले, तर काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांना बाहेर पडता न आल्याने त्यां 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आता अवघ्या सात महिन्यांतच याच समृद्धी महामार्गावर दुसरा भीषण अपघात घडला आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावर भरधाव धावणाऱ्या ट्रॅव्हल्सचालकांवर व ट्रॅव्हल्समालकांवर आता प्रशासन कारवाई करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र अशा कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT