Gondwana Ganatantra Party leaders celebrate a historic victory after winning the Butibori Municipal Council, defeating BJP and Congress in a major political upset in Nagpur district. Sarkarnama
विदर्भ

Gondwana Ganatantra Party: ना भाजप.. ना काँग्रेस... बुटीबोरीत 'गोंडवाना'ने दोन बड्या नेत्यांना दिली धोबीपछाड!

Butibori Election Result : बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीने भाजप आणि काँग्रेसला पराभूत करत नगराध्यक्षासह बहुमत मिळवले, नागपूर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का दिला.

Rajesh Charpe

Nagpur News : सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघातील बुटीबोरी नगर परिषदेत गोंडवाना गणतंत्र पार्टीने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांना धोबीपछाड दित विजय खेचून आणला आहे. नगराध्यक्षासह तब्बल 17 उमेदवार गोंडवानाचे जिंकून आले आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वत्र भाजपची घोडदौड आणि काँग्रेससोबतच संघर्ष सुरू असताना गोंडवानाची संपूर्ण नगर परिषद जिंकून सर्वांनाच धक्का दिला.

आशिष खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी बुटीबोरी येथे आहे. भाजपचे आमदार समीर मेघे यांचे या भागात वर्चस्व आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री रमेश बंग हे सुद्धा याच भागाचे प्रतिनिधित्व करतात. असे असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नगर परिषदेत आपले खातेही उघडता आले नाही. भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सुमीत मेंढे हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.

त्यांच्यासोबत 17 नगरसेवक निवडून आले असून संपूर्ण नगर पररिषद गोंडवानाने आपल्या ताब्यात घेतली आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघात एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. रमेश बंग येथून निवडून यायचे. भाजपच्या विजय घोडमारे यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला.

त्यानंतर समीर मेघे आल्यानंतर उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी संपवली. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनीसुद्धा हिंगणा मतदारसंघावर दावा ठोकला होता. विधानसभेच्या निवडणुकीत काही उमेदवारांना त्यांनी निवडणूक लढण्यासाठी तयार केले होते. मेघे यांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र याच मतदरसंघातील एका छोट्या नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या हाती भोपळा पडला आहे.

एकेकाळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचा रामटेक विधानसभा मतदारसंघात जोर होता. काही पॉकेट्‍स त्यांचे या मतदारसंघात होते. विधानसभेच्या निवडणुकीत गोंडवानाच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांमुळे अनेकांना धक्का बसला आहे. याच पक्षामुळे रामटेक विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या (Congress) हातून गेला.

भाजपात (BJP) येण्यापूर्वी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार असायचे. रामटेकमधील ताकद कमी झाली असली तरी हिंगणा विधानसभा मतदारसंघातील अख्खी नगर परिषद पटकावून गोंडवाने पक्ष अजून जिवंत असल्याचे दाखवून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT