Maregaon -= Yavatmal Sarkarnama
विदर्भ

Chandrababu Naidu News : विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात उमटले चंद्राबाबू नायडूंच्या अटकेचे पडसाद !

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal Political News : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना नऊ सप्टेंबरला आंध्र प्रदेश सीआयडीनं अटक केली. यांच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे त्यांच्या शेकडो समर्थकांनी तथा शेतकऱ्यांनी केंद्र सरकार तथा आंध्र प्रदेश सरकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध करत घोषणाबाजी केली. (Farmers raised slogans against the central government and Andhra Pradesh government)

लोकशाही मार्गाने आंदोलन करून तहसीलदार निलावाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मारेगाव तालुक्यात वास्तव्य करीत असलेल्या नायडू समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती. चंद्राबाबू नायडू यांना कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना त्यांचे समर्थक ठिकठिकाणी आंदोलनं करून याचा निषेध करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज १८ सप्टेंबर रोजी मारेगावतही एका प्रामाणिक आणि विकास पुरुष अशी ओळख असलेल्या चंद्राबाबूंच्या समर्थनार्थ शेकडोंच्या संख्येने लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्रातील आंध्र प्रदेश व केंद्र सरकारचा (Central Government) जाहीर निषेध करण्यात आला.

नायडू यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन केंद्र सरकारने देशातील (India) महागाई, बेरोजगारी, जाती समाजासमाजात निर्माण होत असलेले तेढ बंद करून जनतेच्या कल्याणकडे लक्ष द्यावे, जनतेला मूर्ख बनवून एका प्रामाणिक आणि जनहितार्थ कामे करणाऱ्या माणसाला त्रास देऊ नये आणि असे होत असेल तर जनता येत्या लोकसभा निवडणुकीत (Election) या सरकारला आपला हात मतदानातून दाखवतील, यात आता काहीच शंका नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.

या वेळी मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांना निवेदन देताना माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या समर्थनार्थ आंध्र प्रदेशचे आणि मारेगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT