Yavatmal Crime News : आयपीएसच्या नावे फेक कॉल करीत पैसे उकळण्याचा प्रयत्न; रायटर, तलाठ्यालाही डच्चू !

Yavatmal Police Officers News: पोलिस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
IPS Ranjankumar Sharma, Mahesh Togarwad and Dhananjay Sayre.
IPS Ranjankumar Sharma, Mahesh Togarwad and Dhananjay Sayre. Sarkarnama

Yavatmal Online Fraud News: एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फेक कॉल करीत पोलिस निरीक्षकाकडूनच भामट्याने १० हजार रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच तो भामटा थांबला नाही, तर त्याने त्याच पोलिस निरीक्षकाचा व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुक साइटवर प्रोफाइल फोटो ठेवून त्याद्वारे एका पोलिस रायटर आणि तलाठ्याला गंडा घातला. (There has been an uproar in police circles as police officers are being targeted)

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. आता पोलिस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस दलाचे तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासोबत त्यावेळी पोलिस निरीक्षक महेश तोगरवाड हेदेखील यवतमाळ जिल्हा पोलिस दलात कार्यरत होते. तोगरवाड सध्या मुंबई (Mumbai) पोलिस दलात कार्यरत आहेत.

पीआय तोगरवाड हे एसपी रंजनकुमार शर्मा यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून संपर्कात आहेत. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत एका अज्ञात भामट्याने फेक कॉल करीत एसपी रंजनकुमार शर्मा बोलत असल्याचे पीआय तोगरवाड यांना सांगितले. शिवाय अडचणीत असल्याने १० हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. मात्र, आयपीएस अधिकारी १० हजार रुपये मागतील का, असा प्रश्न पीआय तोगरवाड यांना पडला. त्यातूनच त्यांनी त्या कॉलची चौकशी केली.

चौकशी केल्यावर तो फसवणुकीचा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्याच भामट्याने फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप अकाउंटवर थेट पीआय तोगरवाड यांचे वर्दीतील छायाचित्र ठेवत त्यांच्या संपर्कातील अनेकांना अडचणीत असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. नांदेड येथे पीआय तोगरवाड कार्यरत असताना तेथील त्यांचा सहकारी रायटर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने भामट्याचा संदेश पाहताच तो तोगरवाड यांचा असल्याचे समजून त्या भामट्याला २० हजार रुपये ऑनलाइन पाठविले.

तोगरवाड यांचा एक मित्र यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्यानेही तोगरवाड यांच्या नावे असलेला संदेश पाहून त्या भामट्याला ऑनलाइन ६० हजार रुपये पाठविले. त्यानंतर पैसे मिळाले का, याची खात्री करण्यासाठी त्या दोघांनी तोगरवाड यांना कॉल केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उजेडात आला. त्यानंतर तोगरवाड यांनी यासंदर्भात पोलिसात (Police) तक्रार करून फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप साइटवरील त्याचे अकाउंट ब्लॉक केले.

असे असले तरी त्या भामट्याने पुन्हा तोगरवाड यांच्या नावे अकाउंट उघडून अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. यवतमाळच्या एका माध्यम प्रतिनिधीलाही त्याने आज गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यम प्रतिनिधीला शंका आल्याने त्याचा तो डाव उधळला गेला.

IPS Ranjankumar Sharma, Mahesh Togarwad and Dhananjay Sayre.
Yavatmal Pola News : शिंदे-देवेंद्रसोबत पळाले दादा… बळीराजाचा भुलला हो वादा !

ओरिसातून चालविले जाते ‘रॅकेट’

पोलिस निरीक्षक तोगरवाड यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या या ‘रॅकेट’ची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात ते रॅकेट ओरिसा राज्यातून चालविले जात असल्याची माहिती हाती आली आहे. तेथील नारायणपूर या गावात ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे मोठे रॅकेटच सक्रिय असल्याचे पुढे आले आहे. मात्र, अद्यापपावेतो त्या भामट्याला अथवा त्याच्या रॅकेटमधील सदस्यांना बेड्या ठोकण्यात यश आलेले नाही.

पीआय सायरेंच्या नावानेही गंडा घालण्याचा प्रयत्न...

यवतमाळ जिल्हा पोलिस दलात सुमारे चार महिन्यांपूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय सायरे हे कार्यरत होते. ते सध्या अकोला जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहेत. ते येथे कार्यरत असताना व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुक साइटवर त्यांचा वर्दीतील फोटो असलेले फेक अकाउंट उघडून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने भामट्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला.

Edited By : Atul Mehere

IPS Ranjankumar Sharma, Mahesh Togarwad and Dhananjay Sayre.
Yavatmal Congress News : शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचली कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com