Former BJP leader Subhash Kasanagottuvar at the center of controversy after allegations of fake land certificates and election-related fraud surfaced ahead of Chandrapur municipal elections. Sarkarnama
विदर्भ

BJP Chandrapur: निवडणूक तोंडावर, एबी फॉर्मची गडबड! आता त्याच भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचा आणखी एक कारनामा समोर

Subhash Kasanagottuvar : निवडणुकीआधी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर बनावट पट्टे सर्टिफिकेट व खोटे शिक्के वापरून मतदानावर परिणाम करण्याचा गंभीर आरोप झाल्याने चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली.

Rajesh Charpe

Chandrapur News : महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीत परस्पर बदल केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार आणखी अडचणीत सापडले आहेत. त्यांनी पट्टे वाटपाचे बनावट सर्टिफिकेट, खोटे शिक्के मारून जनतेची उघड फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली असून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक राहिला असताना भाजप नेत्याने केलेला फसवणुकीचा प्रकार समोर आला असल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

भाजपाच्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान एबी फॉर्मच्या वाटपात मनमानी, गोंधळ आणि गैरप्रकार केल्याचे आरोप कासनगोट्टूवार यांच्यावर होता. याची गंभीर दखल घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट पत्र काढत त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. यावेळी एबी फॉर्म चोरीचेही गंभीर आरोप त्यांच्यावर झाले होते.

आता चंद्रपूरमध्ये काही भागांमध्ये पट्टे मिळणार असल्याचे भासवून नागरिकांना बनावट सर्टिफिकेट देण्यात आल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांवर खोटे शिक्के मारून नागरिकांना फसवले गेले आणि मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. जनतेची दिशाभूल करून मतदानावर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल होणार, याकडे आता चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणावर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही थेट तक्रार दाखल करत जोरदार टीका केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे कासनगोट्टूवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक आहेत. महापालिकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर तसेच आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख नियुक्ती झाल्यानंतर कासनुगोट्टूवार यांनी मनमानी करभार सुरू केला होता. त्यांना शहराध्यक्ष करण्यास भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT