Nagpur News: मुख्यमंत्री फडणवीसांनंतर गडकरीसुद्धा उतरले मैदानात; तीन जाहीर सभांमधून विरोधकांवर टीकेची तोफ डागणार

Nagpur Municipal Corporation Election : लोकसभेच्या निवडणुकीत यांना सर्वाधिक मताधिक्य पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाने दिले होते. या मतदारसंघात आज रात्री त्यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत. गडकरी हे स्टार प्रचारक आहेत. शहराच्या तुलनेत पूर्व नागपूरमध्ये सर्वाधिक उड्डाणपुलांची निर्मिती झाली आहे.
Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Nitin Gadkari, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी (ता.9) त्यांच्या तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या समर्थकांच्या प्रभागात जाऊन नागरिकांसोबत संवाद साधला.

नागपूर शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सर्वाधिक नेते लोकप्रिय आहेत. त्यांच्या भाषणांना मोठी गर्दी होते. ते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असते. त्यांची ही लोकप्रियता कॅश करण्यासाठी भाजपच्या सर्वच उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे.

मागील निवडणुकीत माजी महापौर तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना भाजपचे प्रा. दिलीप दिवे यांनी पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली होती. दिवे महापालिकेचे शिक्षण सभापती होते. त्यांनी महापालिकेमध्ये सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. यावेळी भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली आहे

प्रभाग क्रमांक २८ भाजपचा (BJP) मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. विकास ठाकरे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी यावेळी काँग्रेसने कंबर कसली आहे. यावेळी ठाकरे यांनी त्यांचे समर्थक प्रशांत कापसे दिवे यांच्या विरोधात येथे उतरवले आहेत.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Baramati Crime : बारामती नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या जीवाला धोका; पोलिसांच्या तक्रारीत नावंही आलं समोर, केली महत्वाची मागणी

विशेष म्हणजे या जागेवर मोजके चारच उमेदवार रिंगणात आहेत. हे बघता भाजप आणि काँग्रेस या दोनच उमेदवारांमध्ये येथ थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. बसपा आणि भीम सेनेच्या उमेदवार रिंगणात असल्याचे याचा फटका काँग्रेसलाच अधिक बसवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत यांना सर्वाधिक मताधिक्य पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाने दिले होते. या मतदारसंघात आज रात्री त्यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत. गडकरी हे स्टार प्रचारक आहेत. शहराच्या तुलनेत पूर्व नागपूरमध्ये सर्वाधिक उड्डाणपुलांची निर्मिती झाली आहे. सिम्बॉयसिस, नरसी मोन्जी या सारख्या नामवंत शैक्षणिक संस्था याच परिसरात कार्यरत आहेत. मतदारांमध्ये गडकरी यांची असलेली लोकप्रियता कॅश करण्यासाठी सर्वच उमेदवारांची चढाओढ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com