Congress Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Congress : खासदारांची उणीव, मात्र चंद्रपूरात काँग्रेसचं जोरदार आंदोलन; सिलिंडरच्या दरावरुन आक्रमक...

संदीप रायपूरे

Chandrapur News : सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. या महागाईने सर्वसामान्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईने नुसते जीवन जगणे देखील कठीण झाले आहे. अशा कठिण परिस्थितीत सरकारने पाचशे रूपयात गॅस सिंलेडर गोरगरिब जनतेला द्यावे, अशी मागणी करत चंद्रपूरातील घुग्गूस येथे महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा क्रिडा संकुलात मुबलक सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून भिख मांगो आंदोलन केले. (Latest Marathi News)

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यास 450 रूपयाप्रमाणे सिलेंडर गॅस देण्याची घोषणा केली होती. यानुसार काही राज्यात नवीन वर्षापासून 450 रूपयाप्रमाणे गॅस देण्यात येत आहे. लगतच्या तेलंगणातही हा फार्म्युला लागू करण्यात आला आहे. पण महाराष्ट्र राज्यात सिलेंडर गॅससाठी 950 रूपये मोजावे लागत आहेत. हा मोठ्या अन्याय असल्याचे सांगत महिला काँग्रेस आक्रमक झाली. त्यांनी घुग्गूस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करित शासनाचे लक्ष वेधले. घुग्गुसचे काँग्रेसचे नेते राजू रेड्डी, यास्मिन सयद, दिप्ती सोनटक्के, पदमा त्रिवेणी, दुर्गा पाटील, मंगला बुरांडे यांच्यासह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या युवकांना अत्याधुनिक जिल्हा क्रीडा संकुल असावे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना, भरीव निधी देऊन क्रीडा संकुलच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. मात्र शिंदे - भाजप सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा स्टेडियमच्या कामास नियमित निधी दिल्या जात नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. क्रीडा स्टेडियमचे काम रखडले असून, त्याचा अनेक खेळाडू आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवकांना त्रास होत आहे, त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलच्या कामाला लवकरात लवकर भरीव निधी द्यावा. सरकारने तातडीने क्रीडा संकुलाचे काम करावे या मागणीला घेत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा स्टेडियम, गडचिरोली येते भिक मांगो आंदोलन करण्यात आले.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ. नामदेव किरसान, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, मनोहर पोरेटी, सतीश विधाते, विश्वजीत कोवासे, अब्दुलभाई पंजवाणी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यक्रते आणि युवक आंदोलनात सहभागी झाले होते.

नमो चषकच्या नावाने लोकप्रतिनिधींकडून लाखो रुपयाची उधळून करून क्रीडा संमेलन घेतल्या जात आहे, ईडी सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा संकुलाच्या कामास निधी मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबून पडली आहे, तरीही शासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असून, जिल्हा स्टेडियमचे मैदान पूर्ण अस्ताव्यस्त पडले असल्याने, त्याचा खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना नाहक त्रास करावा लागत आहे, असा आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केला .

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT