MSEDCL Supply : आमदार प्रतिभा धानोरकर यांचा महावितरणला ‘हाय व्होल्टेज शॉक’

Protest in Chandrapur : प्रतिसाद न मिळाल्यानं ठोकलं कार्यालयाला कुलूप
MLA Pratibha Dhanorkar Protest
MLA Pratibha Dhanorkar ProtestSarkarnama & Google
Published on
Updated on

MLA Pratibha Dhanorkar Latest News : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कृषिपंपांना थ्री-फेज वीजपुरवठ्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग वीजपुरवठा करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. आता विजेच्या अशाच मुद्द्यावर काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यादेखील आक्रमक झालेल्या बघायला मिळत आहेत.

वारंवार मागणी करूनही सरकार व प्रशासन कोणताही प्रतिसाद देत नसल्यानं आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकलं. आमदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह अभियंता कार्यालय गाठलं व अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून कार्यालय कुलूपबंद केलं. त्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. (MLA Pratibha Dhanorkar locked the Mahavitaran office in Chandrapur for electric supply to Agriculture pump)

आमदार धानोरकर यांच्या या ‘हाय व्होल्टेज शॉक’नं महावितरणची बुद्धी जागेवर आली आहे. अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत विजेची मागणी पूर्ण करणार, असं आश्वासन आमदार ‘मॅडम’ला दिलं. आश्वासन पूर्ण न केल्यास मुख्य अभियंता कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही धानोरकर यांनी दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रात वीजपुरवठा करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरीच विजेपासून वंचित असल्यानं आमदार धानोरकर अनेक दिवसांपासून यासंदर्भात पाठपुरावा करीत होत्या.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झुडपी व मोठे जंगल आहे. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करतात. या वेळी वन्यजीवांच्या हल्ल्याची भीती असते. आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री-फेज वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा आमदार धानोरकर यांनी दिला होता. परंतु कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०२० पासून कृषिपंप जोडणीच्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना जोडणी मिळाली, त्यांना अखंड वीजपुरवठा होत नाही. महावितरणनं थ्री-फेज वीजपुरवठ्याचं वेळापत्रक घोषित केलेय. आठवड्यातून चार दिवस आणि तीन रात्री असा आठ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु २४ तास थ्री-फेज पुरवठा दिल्यास सोयीचे होईल, असं शेतकऱ्यांचं म्हणणे आहे.

महाजनकोकडुन ‘ग्रीड’मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री-फेज वीजपुरवठा मिळालाच पाहिजे ही आपली आग्रही भूमिका आहे. यापुढेदेखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिलाय.

(Edited By : Prasannaa Jakate)

MLA Pratibha Dhanorkar Protest
Pratibha Dhanorkar लोकसभा लढवणार ? | Chandrapur Loksabha |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com