Rajura City Firing Sarkarnama
विदर्भ

Chandrapur News : चंद्रपुरमध्ये गोळीबार ; भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur Rajura City Firing : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे.

काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास अज्ञान व्यक्तीनी केलेल्या गोळीबारात भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला.

अज्ञाताच्या गोळीबारात पूर्वशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला आहे. भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे हे त्यांचे पती होत. या गोळीबारात लल्ली नामक आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.

शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री नऊच्या सुमारास अज्ञातानी सचिन डोहे यांच्या घरासमोर हा गोळीबार केला. आवाज आल्याने पूर्वशा घराबाहेर आल्या. यात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्या. एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमी लल्ली याला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या आरोपी फरारी आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT