Chandrapur District Central Cooperative Bank, LTD. Google
विदर्भ

Chandrapur Bank: चंद्रपूर बँकेच्या निवडणुकीदिवशीच उमेदवारांमध्ये राडा; समर्थकांनी मतदान केंद्रच घेतलं ताब्यात...

Chandrapur Politics : निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पाडली जात नसल्याचा आरोप करून चोखारे यांनी मतदानाची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली आहे. बँकेचे निम्मे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या घटना घडामोडींमुळे चंद्रपूर बँक निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चंद्रपूर असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदाना दरम्यान आज दोन गटात चांगलाच राडा झाला. दोनपरस्पर विरोधात लढणाऱ्या संचालकांच्या समर्थकांनी मतदान केंद्रावर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे काही काळ मतदानाची प्रक्रिया थांबवावी लागली.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार एकत्र आले आहेत. धानोरकर बिनविरोध निवडून आल्या तर वडेट्टीवार यांनी माघार घेतली आहे.

भाजपचे आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनीसुद्धा आपला अर्ज आधीच मागे घेतला आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी आमदार सुभाष धोटे यांचे भाऊ तसचे बँकेचे माजी अध्यक्ष शेखर धोटे यांनीसुद्धा निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतली. आज मतदानाच्या दिवशी सुभाष रघटाटे आणि दिनेश चोखारे यांचे समर्थक आपसात भिडले.

रघटाटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्र ताब्यात घेतले व आपल्या मतदारांना मतदानापासून रोखत असल्याचा आरोप चोखारे यांनी केला. रघटाटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राचा दरवाजा लावून घेतला होता. त्यानंतर चोखारे यांचेही समर्थकांनी दारावर धडक दिली. मतदान केंद्र अधिकाऱ्याने केंद्राचे दार उघडले.

या घटनेचा अहवाल त्यांनी तयार केला असल्याचा समजते. त्यानंतर रघटाटे यांचेही समर्थक आक्रमक झाले. त्यांनी मतदान केंद्राला घेराव घालून मतदान बंद पाडले. रघटाटे यांचे समर्थक गुंड प्रवृत्तीचे आहेत.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पाडली जात नसल्याचा आरोप करून चोखारे यांनी मतदानाची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली आहे. बँकेचे निम्मे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या घटना घडामोडींमुळे चंद्रपूर बँक निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT